पाथर्डी -
शहरातील लोकसंख्येच्या दृष्टीने बहुसंख्य असलेला व कष्टकरी समाज म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या सकल देवांग कोष्टी समाजाचे आराध्य दैवत चौंडेश्वरी देवीच्या नवमी
उत्सवानिमित्त शहरातील कोष्टी बांधवांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित
करत विविध पथकासह सादर केलेल्या भव्य पालखी मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून
घेतले.
शहरात कोष्टी समाज बांधवांची
संख्या मोठी असून अनेक कुटुंबे उद्योग, व्यवसायात कार्यरत
आहेत. अनेक दिवस परिश्रम घेत महीलांनी माघ उत्सवासाठी नियोजन केले होते. समाजाचे
अध्यक्ष रामदास कांबळे, सचिव किशोर पारखे, कृष्णा रेपाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली.
उत्सवा दरम्यान रक्तदान
शिबिर 'दुर्गा सप्तशती पाठ' अखंड नामस्मरण सुवासिनी पूजन
याबरोबरच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. पालखी
मिरवणुकीत 'महिलांचे टाळ पथक' दांडिया,
लेझीम, जोगवा पथकांसह प्रभु श्रीराम लक्ष्मण
सीता व हनुमान यांच्या वेशभूषा केलेल्या बालकलाकारांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
कोष्टी समाज हा बहुसंख्येने कष्टकरी वर्गातील असूनही या समाजातील महिलांनी दिवसभर
घरकाम व उद्योग सांभाळून सायंकाळी सराव करत अत्यंत उत्कृष्ट असे कला पथकाचे
सादरीकरण केले.
देवीची पूजा महाआरती व
महाप्रसादाने सांगता उत्सवाची सांगता झाली. यावेळी शहरातील हजारो भाविकांनी
महाप्रसादाचा लाभ घेतला.उत्सव काळात माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, ओबीसी नेते दिलीपराव खेडकर, राष्ट्रवादीचे
प्रतापराव ढाकणे,समता परिषदेचे राजेंद्र दुधाळ, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, प्रशांत शेळके,
प्रसाद आव्हाड, माजी नगरसेवक रामनाथ बंग,
डॉ. बंडुशेठ भांडकर, अॅड. प्रतिक खेडकर,
इजाजभाई शेख आदींनी भेट देऊन कोष्टी बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी
उमेश खटावकर, हरिभाऊ वाव्हळ, गणेश
रोकडे, अभिजित भागवत, अमोल भंडारी,
गजानन भंडारी, सुनील पारखे, गणेश भागवत, अंबादास घटे, गणेश
टेके, सुनिता उदबत्ते, भारती असलकर
यांच्यासह हजारो बांधव उपस्थित होते.
0 Comments