------------------
राजेंद्र जैन / कडा- स्त्रीभ्रूण हत्येसारखा कलंकीत प्रकार हा नुसते कायदे- नियम करुन सुटणारा नाही. त्याकरिता समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यामुळे मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाने स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे. असे प्रतिपादन आष्टी येथील न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती पी.जी. इनामदार यांनी केले.
कडा येथील श्री. अमोलक जैन शिक्षण संस्था, तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदे विषयक साक्षरता शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सह दिवाणी न्यायाधीश एम. के. पाटील, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. उतकर, सहायक सरकारी अभिवक्ता सी.ए. जावळे, सपोनि विजय नरवडे, वकिल संघांचे अध्यक्ष एच. जी. शिंदे, उपाध्यक्ष इरफान शेख, अॅड, बाबुराव अनार्से, अॅड, संग्राम गळगटे, अॅड, श्रीमती डावकर, अॅड, राकेश हंबर्डे यांच्यासह अमोलक जैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, सचिव हेमंत पोखरणा, संजय मेहेर, अनिल मुथ्था, बिपीन भंडारी, उपप्राचार्य डाॅ. जमो भंडारी, नवनाथ पडोळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्य न्यायाधीश श्रीमती इनामदार म्हणाल्या की, मुलींची घटणारी संख्या ही बाब सामाजिकदृष्ट्या चिंताजनक असून, स्त्रीभ्रूण हत्येतून निर्माण झालेली विषमता मानवनिर्मित आहे. याचा समाजातील सर्वच घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कुठे लिंग निदान चाचणी होत असेल तर त्यावर ही लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी नैराश्य, व्यसनाधिनता यापासून दूर राहून आत्मविश्वास बाळगून सर्वांगिण विकासातून करिअर घडवावे. आपल्या कार्याचा देशाला ही अभिमान वाटेल. असं कर्तृत्व आत्मसाद करावे. असं त्या म्हणाल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अॅड श्रीमती डावकर म्हणाल्या समान वागणूक दिल्यास महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करु शकते. महिला- मुलींनी देखील शोषण होईल तेथे आवाज उठवण्याची गरज असल्याचे म्हणाल्या. अॅड नितीन गायकवाड यांनी माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती सांगीतली. तर अॅड, संग्राम गळगटे यांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा व महिला, मुलींनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. कु. पवळ या विद्यार्थ्यीनीने अभ्यासपुर्ण मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य डाॅ. जमो भंडारी यांनी केले तर आभार अमोलक संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांनी मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------%%---------
0 Comments