पाथर्डी - महाराष्ट्रातील देवी मंदिरांपैकी मुख्य असलेल्या श्री जगदंबा मोहटादेवी देवस्थानच्या अध्यक्ष तथा अहमदनगर येथील जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी बरालिया सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर श्री निरंजन नाईकवाडे - जिल्हा न्यायाधीश १ अहमदनगर यांची नियुक्ती नुकतीच अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लागड्डा यांनी केलेली आहे.
श्री नाईकवाडे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी श्री मोहटादेवीची विधिवत पूजा करून आज पदभार स्वीकारला. त्यानिमित्त देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पदसिद्ध विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार (दिवाणी न्यायाधीश पाथर्डी,) विठ्ठल कुटे, एड. विक्रम वाडेकर, डॉ. श्रीधर देशमुख, श्रीमती अनुराधा केदार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी उपस्थित होते.
0 Comments