पाथर्डी वकील संघास आ.राजळे यांची भेट !

 

पाथर्डी – येथील वकील संघाच्या वतीने राहुरी येथील वकील आढाव दांपत्यांच्या खून प्रकरणी विधानसभेत आवाज उठवून वकिलावरील होणारे हल्ले थांबवन्यासाठी अॅडव्होकेटस् प्रोटेक्शन कायदा संमत करावा तसेच पाथर्डी न्यायालयास नवीन इमारत मंजूर करावी अश्या मागणीचे निवेदन वकील संघाच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना वकील बांधवांच्या वतीने देण्यात आले.  

संघटनेच्या वतीने राहुरी येथील वकील दांपत्य अॅड.राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव यांच्या खून प्रकरणी निषेध नोंदवत येत्या ९ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा ठराव संमत केला असून त्याच अनुशंगाने वकिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ.मोनिका राजळे यांनी पाथर्डी वकील संघाला भेट दिली यावेळी वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर यांनी वकिलावर होणारे हल्ले थांबन्यासाठी येत्या अधिवेशनात अॅडव्होकेटस् प्रोटेक्शन कायदा संमत व्हावा यासाठी आवाज उठवावा अशी मागणी केली तसेच जेष्ठ वकील रामदास भताने यांनी पाथर्डी न्यायालयाची इमारत जुनी झालेली असून जुन्या इमारती मुळे न्यायदानाच्या कामात अडचणी येत असल्याने पाथर्डी न्यायालयासाठी लवकरात लवकर नवीन इमारत मंजूर करावी अशी मागणी केली.

यावेळी उपस्थित सर्वच वकिलांनी या दोनही मागण्यां पूर्ण कराव्यात अशी मागणी केली.आ.मोनिका राजळे यांनी येत्या अधिवेशनात दोनही प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले. यावेळी जेष्ठ वकील आसाराम पठाडे यांनी आ.मोनिका राजळे यांचा सत्कार केला. यावेळी मा.नगराध्यक्ष डॉ मृत्युजय गर्जे,मा.नगराध्यक्ष अभय आव्हाड,माजी उप नगराध्यक्ष नंदकुमार शेळके,मा.नगरसेविका मंगल कोकाटे,भाजपा महिला आघाडीच्या ज्योती शर्मा, भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख नारायण पालवे आदी सह वकील बांधव उपस्थित होते.       

Post a Comment

0 Comments