पाथर्डी – समाजातील वाढत चाललेली गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य सुधारण्याची आवश्यकता असून शरीराच्या व्याधीसोबत मनाच्या विकृत व्याधी सुद्धा कायदेशीर उपचाराने व समुपदेशनाने बऱ्या होऊ शकतात व त्यातून समाजात वाढत चाललेला गुन्हेगारी कमी होऊन सुसंस्कृत समाज घडू शकतो असे मत डॉक्टर मनीषा खेडकर हंगे यांनी विशाखा समितीच्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.
महिलांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार व छळ थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विशाखा समितीची स्थापना करण्यात आली असून त्याच अनुषंगाने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे विशाखा समिती मार्फत पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व या ठिकाणी येणारया महिला रुग्ण यांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यात येते त्याच अनुशंगाने उपाययोजना करण्याच्या संदर्भात विशाखा समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या नवनियुक्त सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बैठकीच्या अध्यक्ष डॉक्टर मनीषा खेडकर, मा. नगरसेविका मंगल कोकाटे, ऍडव्होकेट हरिहर गर्जे, लीला लष्करे,सारिका तमखाने,हेमलता वराडे,स्वप्ना सोनवणे, मोहिनी फरकांडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील तक्रार पेट्या कार्यान्वित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन तात्काळ तक्रार पेट्या सुरू करण्यात आल्या. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणारा त्रास थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यासंदर्भात नियोजन समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर व उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांवर विविध उपचार करण्यात आले.यावेळी विशाखा समितीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छते संदर्भात सामाजिक भावनेतून उपाय योजना करण्या संदर्भात नियोजन करण्यात येवून पाहणी करण्यात आली.कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळा संदर्भात समिती कडे दाद मागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
0 Comments