पाथर्डी - बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार पंकजा
मुंडे यांची राजकीय पुनर्वसन व्हावे त्यांच्यासारख्या जनाधार असलेल्या लोकनेत्यावर
पक्षात होत असलेला अन्याय दूर व्हावा यासाठी जलक्रांती अभियानाचे प्रवर्तक माजी
प्रदूषण आयुक्त व ओबीसी नेते दिलीपराव खेडकर यांनी मोहटादेवीला चांदीचा मुकुट
अर्पण करील असा नवस केला होता त्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना बीड मतदार
संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली खेडकर यांनी मागील महिन्यात देवी चरणी नवस
बोलल्याप्रमाणे खेडकर यांनी सुमारे दीड किलो वजनाचा चांदीचा सुबक कला कसूर कुसर
असलेला मुकुट मोठा देवी चरणी लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज अर्पण केला.
यावेळी पंकजाताई मुंडे यांच्या समवेत खासदार सुजय विखे आमदार मोनिका
राजळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले भाजपचे राज्यचिटणीस अरुण मुंडे भालगावच्या लोकनियुक्त
माजी सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर दिलीपराव खेडकर जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर
मुकुंद गर्जे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोहटादेवी येथे दिलीप खेडकर व
पंकजाताई समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरातून जेसीबी मधून फुलांची उधळण करत भव्य साठ
फुटी पुष्पहार,फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करत पंकजाताईंचे जोरदार स्वागत
केले. यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाले की मोहटादेवी हे मुंडे कुटुंबियांचे
श्रद्धास्थान असून या ठिकाणाहून मला लढण्याची शक्ती मिळते.
0 Comments