श्री क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरागत मानाची होळी पेटवली !

 

पाथर्डी - श्री क्षेत्र मढी येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेली गोपाळ समाजाची मानाच्या होळी अत्यंत  खेळीमेळीच्या वातावरणात दुपारनंतर साडेचार वाजता शांततेत पेटली. होळीचे मानकरी नामदेव शामराव माळी,माणिक धनाजी लोणारे, हरिभाऊ किसनराव हंबीराव, रघुनाथ मुरीलीधर  काळापहाड, पुंडलिक संपत नवघरे, सुंदर लक्ष्मण गिऱ्हे,  या गोपाळ सामाजाच्या मानकऱ्यानी होळी पेटवली.

देवस्थान समितीचे विश्वस्त मंडळ, नाथभक्त ,पोलिस अधिकारी यावेळी उपस्थीत होते. या मानाच्या होळीसाठी राज्यभरातून गोपाळ समाज मोठ्या संख्येने मढी येथे दाखल झाला होता चैतन्य कानिफनाथ मंदिर बांधण्याला गोपाळ समाजाने  खूप मोठी मदत केल्याने  गावची सार्वजनीक होळी पेटवण्याचा मान त्या समाजाला  देऊन स्थानीक ग्रामस्त आज  होळी करत नाहीत. दुपारी गोपाळ बांधवानी समाजाची बैठक घेऊन विवीध समस्यांची चर्चा सुरू झाली. त्यांनतर पाच मानकऱ्यांना पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ गडावर गेले. नाथाच्या समाधीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीच्या वतीने मानकरी यांना मानाच्या गोव-या  देण्यात आल्या . मानाच्या गोवऱ्या घेत त्या डोक्यावर ठेऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराला प्रदिक्षणा घातली त्यानंतर गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ पोलीस बंदोबस्तात पाच मानकरी येऊन होळी पेटविण्यात आली.

या वेळी प्रांतअधिकारी प्रसाद मते ,पोलिस उपअधिक्षक सुनील पाटील, नायब तहसीलदार भानुदा गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, जगदिश मुलगीर, शिवाजी तांबे,सचिन लिमकर,भगवान सानप,मढी देवस्थान समीतीचे संजय मरकड,  बबन मरकड ,  रवींद्र आरोळे , भाऊसाहेब मरकड ,शामराव मरकड , डॉ . विलास मढीकर, भाग्येश मरकड आदीसह गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . गोपाळ समाजाचे प्रकाश सावंत, झेंडु पवार, कैलास पवार, बाबासाहेब गव्हाणे, प्रकाश गायकवाड, युवराज पवार, लहु गव्हाणे, कृष्णा सावंत, विलास गायकवाड ,गोरक्ष गि-हे यांच्यासह राज्यभरातुन आलेला गोपाळ समाज उपस्थीत होता. चौकट- प्रशासनाने गोपाळ समाजाला आचरसंहितेच्या कारणामुळे कोणताही वाद नको व लवकर होळी पेटवावी असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गोपाळ समाजाच्या बांधवांनी लवकरच होळी पेटवुन सण साजरा केला. देवस्थान समितीच्या वतीने बबनराव मरकड यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments