सोमठाणे नलवडे शाळेची नेत्रदीपक कामगिरी !

 

पाथर्डी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे शाळेची एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेतील यशानंतर  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.

शाळेतील १८ पैकी ५ विद्यार्थी परीक्षेमध्ये भरघोस गुणांनी पात्र ठरलेले असून अनुष्का बाळासाहेब काटे २०२ ,  ओंकार काकडे २००, अविनाश  काकडे १६४ , सृष्टी क्षीरसागर १५८ व गौरव कासोळे १४० गुण मिळवून पात्र ठरलेले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी अनुष्का, ओंकार, सृष्टी व गौरव या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी २२५०० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल एवढे गुण आहेत.

पाथर्डी पासून दूर अंतरावरील शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असे सोमठाणे नलवडे गाव असले तरी त्या ठिकाणी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये नेत्र दीपक कामगिरी करून आपल्या गावचे शैक्षणिक मागासले पण दूर केले आहे. सन २०२३-२४ च्या एन एम एम एस परीक्षेतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे  आठवी स्कॉलरशिप मध्ये सुद्धा शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी प्रविष्ट केले होते.


Post a Comment

0 Comments