बचत गटाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था बळकट होईल !

 

पाथर्डी - महिला प्रत्येक क्षेत्रात चिकाटी व मेह्नितीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करत असून, केंद्र व राज्य शासनाने महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग व व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन पर निधी उपलब्ध करून दिला आहे, याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांना दैनंदिन बचतीची सवय लागली असून याच माध्यमातून ग्रामीण भारतातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास हातभार लगत आहे. पुरुषांसोबत महिलांना देखील प्रत्येक क्षेत्रात समान संधी उपलब्ध झाल्या तर देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास हातभार लागेल असे मत यावेळी बोलताना अॅडव्होकेट हरिहर गर्जे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले

पाथर्डी महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र पाथर्डी यांच्या वतीने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बचत गटाच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.



दिनांक १० मार्च ते १२ मार्च या दरम्यान आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या महोत्सवामध्ये पाथर्डी तालुक्यातील बचत गटाच्या महिला भगिनींनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्तपणे विविध बचत गटाच्या उत्पादनाचे स्टॉल या ठिकाणी लावले होते.या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेट देऊन बचत गटाच्या उत्पादनांची खरेदी केली तसेच महिलांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांचे कौतुक केले.

यावेळी हिरकणी साधन केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब बांगर राहुल पाठक,अशोक चौधरी,अमोल पवार,भारती असलकर,अनिता काटकर,हिरा माळवे,स्मिता आगळे,हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र अध्यक्ष अनिता कटारनवरे,विजया दहिफळे,प्रतिभा घोरपडे,दुर्गा जाधव,वर्षा शिरसाट,बेबी शिरसाट,पूजा वाघमारे,यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments