पाथर्डी
- महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या अहमदनगर
जिल्हाध्यक्षपदी शिरसाटवाडी चे विद्यमान सरपंच अविनाश पालवे यांची नियुक्ती मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली.
९ मार्च मनसेचा
वर्धापन दिन असून या दिवशी नाशिक येथे झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये पालवे
यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, मनसेच्या
स्थापनेपासून अविनाश पालवे हे पक्षात कार्यरत असून राज ठाकरे यांचे निष्ठावंत
म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत
निवडणुकीमध्ये शिरसाटवाडी गावामध्ये स्वतःचा पॅनल उभा करून मातब्बर पुढाऱ्यांचा
पराभव करत सर्वच्या सर्व जागा जिंकत विजय मिळवून जिल्ह्यात मनसेचा एकमेव सरपंच
होण्याचा मान अविनाश पालवे यांनी मिळवला. शिरसाटवाडी गावामध्ये अनेक विकास कामे
करून कामाचा माणूस म्हणून तालुक्यात नावलौकिक मिळवला आहे.
मनसे शेतकरी
सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी पालवे यांची निवड झाल्याने जनतेमध्ये मनसेबद्दल विश्वास
वाढला आहे या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments