पाथर्डी - पाथर्डी
शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वर जास्त गर्दी झाल्यामुळे व
वाहनांचा वेग भरधाव असल्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. महामार्गावर अपघात
प्रवण भागात गतिरोधक बसविण्याची मागणी होत असताना या मागणीकडे महामार्ग प्रशासन
दुर्लक्ष करत आहे. यासाठी अनेकांनी आंदोलनाचा इशारा ही निवेदनाद्वारे दिला होता. तरीही
प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरू
म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, सामाजिक
कार्यकर्ते मुकुंद गर्जे, माजी उपनगराध्यक्ष बंडुशेठ बोरुडे,
क्रांती दलचे संस्थापक विष्णुपंत पवार, रमेश
गोरे, महेश काटे, रोहिणी ठोंबे,
आप्पासाहेब बोरुडे, सोमनाथ बोरुडे यांच्या
नेतृत्वाखाली पोळा मारुती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेकडो तरुणांनी सहभाग घेत
सुमारे दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. आंदोलकांच्या भावना तीव्र असल्याने
प्रशासनाने लगेचच गतिरोधकाचे काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अरविंद सोनटक्के, भोरू
म्हस्के, मुकुंद गर्जे यांनी तिव्र भावना व्यक्त
केल्या. यावेळी बोलताना गर्जे म्हणाले की,
सहा वर्षे रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खराब असल्याने
अनेकांचा बळी गेला. आता कसातरी रस्ता पुर्ण झाला परंतु निकृष्ट व अर्धवट काम
यामुळे अपघाताची मालिका थांबायला तयार नाही. महामार्गावर कुठेही दिशादर्शक फलक
नाहीत. अपघात प्रवण क्षेत्र, वळण, चौक,
रस्ता दुभाजक, फाटा अथवा गावाचे फलक नाहीत.
गतिरोधक नाही त्यामुळे वाहकाचे वेगावर नियंत्रण राहत नाही व अपघात घडत आहेत
त्यामुळे निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा यावर
कोणतीही कार्यवाही केल्या जात नाही. ठेकेदार व अधिकारी यांच्या कडून जाणीवपूर्वक
दुर्लक्ष केल्या जाते. तालुक्यातील प्रत्येक विभागातील अधिकारी, पालिका प्रशासन लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे सुद्धा डोळेझाक करतात.
हे अधिकारी असे मुद्दामून वागत आहेत का असा प्रश्न आता जनतेला पडू लागला आहे. का
याच्या पाठीमागे काही हेतू आहे हे समजायला मार्ग नाही. अन्यथा आमच्या लोकांच्या
जीवाच्या रक्षणासाठी आम्हाला कायदा हातात घेऊन राष्ट्रीय महामार्ग जेसीपी ने
फोडावा लागेल. असे शेवटी गर्जे म्हणाले. यावेळी आंदोलकांनी कसबा विभागातील पोळा
मारुती मंदिर, श्री तिलोक जैन विद्यालय, शिक्षक कॉलनी माळीबाभूळगाव या ठिकाणी
गतीरोधक बसविण्याची मागणी केली.
तसेच कसबा पेठ मारुती मंदिर येथे
पगारे वस्ती कडून येणारे पाणी, रामगीर टेकडी वरून येणारे पाणी,
कोरडगाव चौकात येणारे व साचणारे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे तसेच
शासकीय विश्रामगृहाजवळ शंकरनगर मधून येणारे पाणी सरळ रस्त्यावर येत असल्यामुळे या
ठिकाणी रस्ता निसरडा होऊन शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर नागरिकांचे
सायकल, दुचाकी चार चाकी गाड्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत
आहे. असे असताना नगर पालिकेने व आपल्या कार्यालयाने संबंधित दोन्ही ठिकाणी साईड
गटारचे काम करणे गरजेचे आहे.
यावेळी दिलावरभाई बागवान, सुनील जाधव, सोपान भिंगारे, देविदास
लोखंडे, प्रकाश ठोंबे, रमेश गोरे,
पांडुरंग सोनटक्के, नाना शिदे, संतोष फलके, महादेव बोरुडे, देविदास
शिंदे, किशन फतपुरे,संजय पगारे,
दादा धाडगे, ज्ञानेश्वर पानखडे आदी आंदोलनात
सहभागी झाले होते.
0 Comments