पाथर्डी - केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत
शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील सुमारे 175 कोटीच्या रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन
गडकरी यांना आज मागणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग पैठण-पंढरपूर पालखी मार्ग व
खरवंडी-नवगण राजूरी या रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत, तसेच प्रस्तावीत छत्रपती संभाजीनगर ते पुणे
या रस्त्याच्या विकास आराखडयाला मंजूरी देवून या रस्त्याचे काम होणेसाठी कार्यवाही
करावी. अशा मागण्या यावेळी केल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले.
आज केंद्रीय रस्ते व
वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नांदूर शिंगोटे ते कोल्हार राष्ट्रीय महामार्गाचे
भूमिपूजन व खा. बाळासाहेब विखे यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राच्या दुस·या आवृत्तीचे प्रकाशनासाठी लोणी येथे आले
असता आ. मोनिका राजळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शेवगांव व पाथर्डी
तालुक्यातील महत्वाच्या व मोठया रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुमारे 175 कोटी रुपयांच्या निधीची
मागणी केली. तसेच बऱ्याच वर्षापासून प्रलंबीत असलेले राष्ट्रीय महामार्ग
पैठण-पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी नवगण राजूरी या रस्त्यांच्या कामांच्या अडचणी
बाबत सविस्तर माहीती मंत्री महोदयांना दिली.
पैठण-पंढरपूर पालखी मार्गातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादनासाठीचे निवाडे, व अवॉर्ड झाले आहेत त्या
शेतकऱ्यांना तातडीने मोबदले दिल्यास
महामार्गाचे काम सुरळीत व तातडीने होईल. त्यासाठी तात्काळ निधी मिळावा तसेच
छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावीत झालेला असून
त्याचे सर्वेक्षण होवून विकास आराखडा करण्याचे काम सुरु आहे. हा नवीन महामार्ग
लवकरात लवकर मंजूर होवून रस्त्याचे काम करण्याबाबतही मागणी यावेळी मंत्री नितीन
गडकरी यांना मांडली. मंत्री महोदयांनी रस्ते मार्ग निधीतील रस्ते घेण्यात येतील व
पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम पुर्ण होण्यासाठी शेतक·यांचे मोबदले अदा करणे व इतर अडचणी
सोडवण्याचे आश्वासन यावेळी दिली.
0 Comments