पाथर्डी येथील श्री तीलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात
कार्यरत असलेले प्राध्यापक श्रीकांत काळोखे यांची मेक्सिको येथील वादालाहारा
विद्यापीठात विविध विषयावर उत्कृष्ट व्याख्याता म्हणून निवड करण्यात येवून ते
दुसऱ्यांदा मेक्सिको येथील वादालाहारा विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी रवाना
झाले आहेत.
मेक्सिको येथील
वादालाहारा विद्यापीठाने विद्यार्थी व शिक्षकांसमोर प्राध्यापक श्रीकांत काळोखे यांची सहा व्याख्याने आयोजित केली आहेत व त्यासाठी काळोखे यांना निमंत्रित केले
असून १४ मे २०२५ ते २८ मे २०२५ पर्यंत या विद्यापीठात प्राध्यापक श्रीकांत काळोखे यांचे वास्तव्य असणार आहे. या आधी सुद्धा २०१९ मध्ये त्यांना अतिथी व्याख्याता म्हणून निमंत्रित केले
होते.
श्री तिलोक जैन
कनिष्ठ महाविद्यालय आणि वादालाहारा विद्यापीठ मेक्सिको यांच्यात झालेल्या
विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणीक देवाणघेवाण करारा अंतर्गत
गेल्या ७ वर्षांपासून या संस्थांमधील विद्यार्थी आपसातील समन्वयातून रसायनशास्त्र, पर्यावरण, इंग्रजी,संभाषण व संस्कृती या
विषयांवर संशोधन व देवाणघेवाण करीत आहेत. या समन्वयामुळे या संस्थांमधील मधील वियार्थ्यांनी
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळविली आहेत.
एका बाजूला हल्ली राज्यातील दहावी बारावीच्या ढ गोळ्यासाठी पाथर्डीतील
ठराविक शिक्षण संस्थाकडून कॉपी सेंटर चालवले जात असताना दुसऱ्या बाजूला येथील शिक्षण
क्षेत्रातील सकारात्मक बाजू म्हणून पाथर्डीचे प्राध्यापक आता थेट मेक्सिको येथील
वादालाहारा विद्यापीठात गुणवत्ता पूर्ण व्याख्याने देत असल्याने पाथर्डीकरांच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे.
0 Comments