परराज्यातील गांजा विक्री करणारी टोळी जेरबंद

 

पाथर्डी - पोलिसांनी मोठी कारवाई करत परराज्यातून गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली असून सुमारे २७,४१,२०० /- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 06 जानेवारी 2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मध्यप्रदेश राज्यातील दोन इसम बोलेरो पिकअपमधून गांजा विक्रीसाठी पांढरी पुल ते पाथर्डी मार्गे येत आहेत. खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी मीरी शिवारात सकाळी १० वाजता सापळा रचून सदर वाहन अडवले.

पकडलेल्या बोलेरो पिकअप (क्रमांक MP-४६-ZE-५३९) मधील तुलसीदास दर्गादास खरगे (वय २५) दिनेश सिलदार सोलंकी (वय २४)  दोन्ही रा. गोई, ता. सेंदवा, जि. बडवाणी, राज्य मध्यप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता रिकाम्या कॅरेटखाली लपवून ठेवलेला ६०.०४ किलो वजनाचा गांजा (७ गोण्यांमध्ये) मिळून आला. या गांजाची अंदाजे किंमत २०,४१,२००  असून बोलेरो पिक अपची किंमत ७,००००० आहे. एकूण जप्त मुद्देमाल २७,४१,२०० /- इतका आहे.

या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २२/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), (क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), मा. वैभव कुलबर्मे (अपर पोलीस अधीक्षक) व मा. नीरज राजगुरू (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


Post a Comment

0 Comments