श्री जगदंबा
देवी सार्वजनिक ट्रस्ट,श्री क्षेत्र मोहटादेवी न्यासाच्या
विश्वस्त पदाकरिता अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रसिद्ध
केलेल्या प्रकटनानुसार मोहटे गावातील ५ विश्वस्त पदाकरिता ८९ तर मोहटे
गावाव्यतिरिक्त भाविक भक्तांतून १८७ अर्ज विहित मुदतीमध्ये प्राप्त झाले आहेत.
विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाल दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपत आहे.नवीन
विश्वस्त नेमणुकीबाबत दि ३० ऑगस्ट २०२२ रोजी प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते तर
अर्ज दाखल करण्याची मुदत दि १० सप्टेंबर २०२२ पर्यंत होती.त्यामुळे नूतन कालावधीसाठी नवीन विश्वस्त नेमणुकीसाठी अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश
सुधाकर यार्लगड्डा यांनी अर्जदारांची यादी
देवस्थानचे सूचना
फलक तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
0 Comments