पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान येथून मे.विवेकानंद दुध
संकलन केंद्र यांनी संकलित केलेले ९५० लिटर भेसळयुक्त दुध अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी नष्ट केले आहे.
मे.सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. शेवगाव एमसीसी, शेवगाव या प्लांटचीही सखोल तपासणी करण्यात आलेली असुन तेथे प्रक्रिया करण्यात आलेल्या गाय दुधाचा नमुनाही विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली घेतली आहे.
दुध संकलन केंद्र चालकांनी सकाळी व
संध्याकाळी दोन वेळा ताजे दुध स्वच्छ, निटनेटक्या व आरोग्यदायी वातावरणात स्टेनलेस स्टील अथवा अॅल्युमिनीयम कॅन्समध्ये दुध
स्विकारुन संकलना नंतर तीन तासाचे आत शितकरण केंद्रात पोहोच होईल याची काळजी घेण्याचे व दुध शितकरण
केंद्रानी दुध स्विकारताना सर्व भेसळकारी पदार्थांच्या
चाचण्या घेऊनच व्यावसायीकांचे दुध स्विकारु नये व दुध
भेसळीसंदर्भात काही माहीती असल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
0 Comments