पाथर्डी - तालुक्यातील डमाळवाडी येथील तरूण शेतकरी राजू पटेल यांचा अंगावर वीज पडुन जागीच मृत्यू झाला त्यामुळे आ.मोनिका राजळे यांनी मयत राजू पटेल यांच्या घरी भेट देऊन मयत राजु पटेल यांच्या पत्नीकडे प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा चार लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करून त्यांचे सांत्वन केले .
१७ ऑक्टोबर २०२२ रोजी कामानिमीत्त शेतात गेलेले राजू पटेल यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. प्रशासनाने यांची तात्काळ दखल घेत आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजुर केला.गुरुवारी आ.मोनिका राजळे यांनी मयत राजु पटेल यांच्या घरी भेट देऊन मयत राजु पटेल यांच्या पत्नीचे सांत्वन करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने तातडीची मदत म्हणुन चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी तहसीलदार शाम वाडकर, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, माजी पं.स.सदस्य सुनील ओव्हळ, शिवाजी मोहिते, रावसाहेब मोरे,शिवनाथ मोरे, मंडळ अधिकारी वैशाली दळवी, तलाठी राजू मेरड,बडे मॅडम,समीर पठाण, समीर यासीन पठाण आदि यावेळी उपस्थित होते.
0 Comments