गणपतीचे आव्हाणे ते मळेगांव रस्त्याची दुरवस्था

आव्हाणे - राज्यात लौकिक असलेल्या स्वयंभू निद्रीस्त गणपती देवस्थानच्या गावाकडे अमरापूर, मळेगाव, ढोरजळगाव व निंबेनांदुर येथून जाणा-या चारही प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल, विखुरलेली खडी,रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या वेड्या बाभळी यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


आव्हाणे बुद्रुक ता.शेवगाव हे संपूर्ण राज्यात लौकीक असलेले व निद्रीस्त गणेशमुर्ती असलेले एकमेव गणपती देवस्थान आहे. त्यामुळे येथे राज्यातील वेगवेगळ्या भागातून येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. गेल्या दोन वर्षापासून अमरापूर -आव्हाणे, ढोरजळगाव - आव्हाणे, मळेगाव - आव्हाणे, निबेंनांदुर - आव्हाणे या चारही प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे.

जागोजागी रस्ता खचून त्यावर जागोजागी पडलेले लहान मोठे खड्डे, ते तात्पुरते बुजवण्यासाठी टाकलेली मोकळी खडी व माती डांबराअभावी अनेक ठिकाणी मोकळी होवून रस्त्यावर विखुरली आहे. तर पावसामुळे खडयात पाणी साचून त्याचा खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. भाविकांप्रमाणेच या परिसरातील आव्हाणे खुर्द व बुद्रुक, शहापूर, ब-हाणपूर, दिंडेवाडी या गावांतील नागरीकांना व विदयार्थ्यांना दैनंदिन वापरासाठी हेच प्रमुख रस्ते असल्याने त्यांना देखील ये जा करतांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.येथील स्थानिक रहिवासी किशोर वाणी यांनी सांगितले की,आगळ्यावेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वयंभू निद्रिस्त गणपती देवस्थान आसल्यामुळे आव्हाणे येथील गणपती देवस्थानचा लौकिक संपूर्ण राज्यात आहे.मात्र येथे येण्यासाठी असलेले चारही बाजूचे प्रमुख रस्ते खराब झालेले आहेत. त्याचा त्रास येणारे भाविक व ग्रामस्थ यांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे सर्व रस्ते दुरूस्त करण्यात यावेत.

Post a Comment

0 Comments