वल्लभभाई पटेल यांचे जीवन युवकांसाठी आदर्श

पाथर्डी - वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले असून त्यांनी वकिली करत गुजरातमध्ये खेडूतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला त्यांचे जीवन चरित्र युवकांसाठी आदर्श असून त्यांचा आदर्श घेवून आजच्या युवकांनी आपले जीवन घडवले पाहिजे असे प्रतिपादन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी व्यक्त केले.

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त  महसूल, शिक्षण व पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.यावेळी वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी त्यानंतर विद्यालयाचे ते वसंतराव नाईकचौका पर्यंत रस्त्यावर धावत रॅली काढली.यावेळी श्रेया श्रीराम तुपे ह्या विद्यार्थिनींनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारा जीवनपट आपल्या भाषणातून उत्कृष्ट पद्धतीने सादर केला.

यावेळी गट विकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे,नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत डांगे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल भवार, केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे, प्राचार्य अशोक दौंड,उपप्राचार्य विजय छाजेड, दिलावर फकीर, सुधाकर सातपुते, महेंद्र राजगुरू, सुनील मरकड, प्रकाश पुरी, अशोक गर्जे,अजय शिरसाट,हरी सानप, रवी शेकटकर, दिपक मिरपगार, अंबादास आंधळे, पोलीस नाईक दादासाहेब बोरुडे,भगवान गरगडे आदी उपस्थित होते.आभार प्राचार्य अशोक दौंड यांनी मानले.

 


Post a Comment

0 Comments