पाथर्डीतील जुन्या मराठी शाळेला आग


पाथर्डीशहरातील जिल्हा परिषदेच्या अधीन असलेल्या,जुन्या मराठी मुलांच्या शाळे शेजारील इमारतीच्या शेजारी असलेल्या शाळेच्या बंद इमारती मधील जुन्या साहित्याला आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आग लागून आगीत एका खोलीमधील जुने सामान भस्मसात झाले आहे.                                                        


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषदेची मराठी मुलांची शाळा असून या शाळे शेजारी जिल्हा परिषदेची जुनी वापरात नसलेली इमारत आहे,या इमारतीचे निर्लेखन प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून पालिकेकडे असलेल्या कराची थकबाकी भरल्याने धुळखात पडून आहे.यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी संबधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असून त्यास अद्यापी यश आलेले नाही. याशिवाय शाळेच्या दक्षिण बाजूला खरेदी विक्री संघाची जुनी इमारत नूतनीकरणासाठी पाडण्यात आली असून,नूतनीकरणाचे काम दोन वर्ष उलटून अद्यापही सुरू झालेले नाही त्यामुळे या बाजूचा भाग उघडा झाल्याने शाळेच्या आवारात मद्यपी,गांजा पिणारे शौचास लघवीला येणाऱ्याची तसेच मोकाट जनावरे,डुकरे अश्या उपद्रवी मूल्यांची या ठिकाणी गर्दी असते, सदरील मानवी उपद्रवा बाबत कारवाई होण्यासाठी शाळेच्या वतीने पोलीस ठाण्यास लेखी पत्र देण्यात आली असून त्यावर अद्यापी कुठलीही कारवाई झालेली नाही.


खरेदी-विक्री संघाच्या इमारतीचे बांधकाम साहित्य ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने,जिल्हा परिषदेच्या शाळेचे मैदान वापरण्याची मागणी खरेदी विक्री संघाच्या वतीने जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती त्यावर जिल्हा परिषदेने शाळेच्या विध्यार्थी पालकांची बैठक घेऊन तसा अभिप्राय मागितला होता परंतु पालकांनी शाळेच्या परिसरात बांधकाम साहित्य ठेवल्यास विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते त्यामुळे या बांधकाम साहित्य ठेवण्यास विरोध दर्शवला आहे.


दरम्यान आज दुपारी .३० ते .०० वाजेच्या दरम्यान अचानकपणे बंद अवस्थेतील एका खोलीतून मोठ्या प्रमाणावर धूर आगीचे लोळ दिसू लागल्याने शाळेतील उपस्थित शिक्षकांनी पाथर्डी पालिकेच्या अग्निशामक दलाला कळवले मात्र शाळेच्या पूर्व बाजूच्या गेटने अग्निशामक गाडी रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शाळेच्या आवारात येऊ शकली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगवधान राखत शाळेच्या मागील बाजूने अग्निशामक गाडी लावून आग विझवण्याचे काम सुरू केले, अर्ध्या तासात सदरील आग विझवण्यात आली,सदरील आगीत विशेष असे नुकसान झाले नाही. परिसरात घटनेची माहिती झाल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, घटना ठिकाणी गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांच्यासह संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.   


एकीकडे आग विझवण्याचे काम सुरू असताना शाळेच्या आवरत बसून काही उपद्रव मूल्य गांजा पिताना तसेच काही लोक शाळेच्या आवारात उघड्यावर लघवी करताना दिसून आले,याबाबत पुढील काळातील अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी दखल घेऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.ज्या खोलीतील सामानाला आग लागली त्या खोलीत विजेचे वायर नाही तसेच दरवाजे खिडक्या बाहेरून पत्र्याचे आवरण मारून बंद केलेल आहे त्यामुळे ही आग कशामुळे लागली याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.


Post a Comment

0 Comments