बळीराजा कॉरंटाईन सेंटरला मदतीची गरज

करंजी - अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातील पिक गेलेआता जनावरांचा लंम्पी रोगाने बळी जात आहे.त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना बळीराजा कॉरंटाईन सेंटरचा आधार वाटत आहे मात्र या जनावरांच्या कॉरंटाईन सेंटरला शासनाच्या मदतीची गरज आहे. 

अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातातील पिकही गेले, आणि आता घरासमोरील असणारे पशुधनही संकटात असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.या भागात खंडोबावाडी, घाटसिरस, डमाळवाडी, जोहारवाडी, भोसे आदि अनेक गावात जनावरांना लंम्पी  रोगाची लागण झाली आहे तर या रोगामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. या जनावरांना इतर जनावरापासुन बाजुला ठेवण्यासाठी शेतकरी आपली जनावरे तिसगावजवळील बळीराजा कॉरंटाईन सेंटरमध्ये भरती करीत आहेत.सामाजिक कार्यकर्त शरद मरकड यांनी लोकसहभागातून हे कॉरंटाईन सेंटर उभे केले आहे. भोसे ग्रामपंचायतीने आज या सेंटरसाठी ११ हजार रुपयाची देणगी दिली. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी हजर होते.

      

दुष्काळात शासनाने शेतकऱ्यांचे पशुधन वाचावे म्हणुन छावण्या काढल्या, परंतु अशा संकटाच्यावेळी या बळीराजा कॉरंटाईन सेंटरला  शासनाच्या मदतीची गरज आहे. राज्यातील पहिले जनावरांच्या या  कॉरंटाईन सेंटरमध्ये १५० च्यावर जनावरे असुन जनावरांची अवस्था अतिशय बिकट आहे.या सेंटरच्या मदतीसाठी दानशूर व्यक्ती, देवस्थान तसेच शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे मत भोसेचे सरपंच विलास टेमकर व अशोक टेमकर यांनी व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी हजर होते.

या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे पशुधन या संकटातून वाचले पाहिजे म्हणुन आम्ही हे जनावरांचे लंम्पी कॉरंटाईन सेंटर सुरु केले आहे. मात्र  शासनाने अद्याप कोणतीही मदत या सेंटरला केली नाही - शरद मरकड (बळीराजा कॉरंटाईन सेंटर)

 

Post a Comment

0 Comments