अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह ?

 


अहमदनगर लाचलुचपत विभागातील बड्या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट पोलीस उपअधीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची खातेनिहाय व संपत्तीच्या उघड चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी केल्याने प्रशाकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन वर्षा पासून जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या वतीने घालण्यात येणाऱ्या धाडी फसल्या जातात,लाच मागणी प्रकरणावर गुन्हे दाखल करून कार्यवाही केली जाण्याचे प्रमाण अधिक आहे.दाखल गुन्ह्यात खालच्या दर्जाचे कर्मचारी यांचा समावेश जास्त आहे. मग लाच मागणी होई पावेतो सापळा ओक मध्ये प्रवास करतो मग नेमके लाच रक्कम स्वीकारताना कुठे माशी शिंकते याचा शोध लागणे गरजेचे आहे.बहुतेक वेळा खबर फुटतेच कशी ?  लाचलुचपत विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांनी सार्वजनिक ठिकाणी सत्कार स्वीकारू नये,वावरू नये याबाबत संकेत व नियम आहेत मग यास अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अपवाद आहे का ? असे प्रश्न नगरकरांच्या मनात उपस्थी होत आहेत.गेल्या दोन दिवसा पासून अहमदनगर जिल्ह्यातील वृत्तपत्रा मधून लाचलुचपत विभागातील भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांच्या हप्तेखोरी बाबतीत  प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे मथळे छापून येत आहेत. मग या विभागातील वरिष्ठांना याचे काहीच सोईर सुतक नाही का ? कि गप्प बसून त्यांचाही या सत्कार्यात सहभाग आहे हा प्रश्न नगर वासियांना पडला आहे.


लोकशाही व्यवस्थेत कायदेमंडळ, न्यायव्यवस्था,कार्यकारी विभाग आणि माध्यमे अशी चार आधारस्तंभ मानले जातात राज्यघटनेने अभिप्रेत असलेले नियम व कायदे याची अंमलबजावणी करण्यासाठी व नागरिकांना शासकीय सेवा देण्यासाठी शासनचे पोलीस व इतर विभाग कार्यरत असतात. या नौकरशाहीच्या हाती कायद्याने मोठी ताकद व कवच दिलेली आहे मात्र या ताकदीचा गैरवापर करून कुणीही भ्रष्टाचार अथवा वाम मार्गाने पैसा जमवू नये म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागा सारखे विभाग कार्यरत असतात. लोकसेवकाने जनतेला विना अडवणूक नियमानुसार सेवा द्यावी असा याचा उद्देश आहे मात्र लाचलुचपत विभाग जर जाणीव पूर्वक भ्रष्ट्राचाराचे आरोप असलेला व अनेक वर्षा पासून एकाच ठिकाणी चिकटून बसलेले अधिकार अथवा कर्मचारी पाळत असतील तर मात्र या लोकशाही देशात अराजकतेला सुरवात झाल्या सारखेच  आहे.       

पाथर्डी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी तर थेट पोलीस अधीक्षक नाशिक,मा.गृहमंत्री,पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी मुंबई.मा.अप्पर पोलीस अधीक्षक  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचे कडे लेखी तक्रार करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांची खातेनिहाय चौकशी व त्यांच्या संपत्तीची उघड चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून कार्यमुक्त करणे बाबत मागणी कलेली आहे .


                       किसन आव्हाड यांनी केलेली तक्रार पुढील प्रमाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे मागील तीन ते चार वर्षापासून पोलीस उपअधीक्षक या पदावर हरिष दत्तात्रय खेडकर हे कार्यरत आहेत. खेडेकर साहेबांनी अहमदनगर येथे रुजू झाल्या नंतर सुरवातीचे दोन वर्ष समाधान कारक कामगिरी केलेली आहे, मात्र खेडेकर साहेबांचा अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण होत आला तेव्हापासून त्यांचा कामाचा आलेख खालावला असून खेडेकर साहेबांनी संपूर्ण नगर जिल्ह्यामधील सर्वच कार्यालयामधून कार्यवाही न करण्यासाठी सर्वत्र हप्ते वसुली सुरू केली आहे,खेडेकर साहेबांच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत अनेक वेळा प्रत्यक्ष अनुभव आला असून सामाजिक कामाच्या नात्याने संपूर्ण जिल्हाभर कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून अनेक वेळा कार्यकर्त्यांचे याच कामासाठी फोन येतात व कार्यकर्ते अश्या कार्यवाही साठी नगरचे खेडेकर साहेब नको त्यांची संबधित विभागाशी पूर्ण सेटिंग झालेली आहे त्यांचेकडून लगेच बातमी लीक होते व सापळे फसतात असे सर्रास पने अनेक तक्रारदार बोलतात त्याचा अनेक वेळा मला देखील अनुभव आलेला आहे त्यामुळे मी अनेक वेळा आपल्याला प्रत्यक्ष फोन करून साहेब नाशिक चे पथक पाठवा असे सांगितले आहे.


अहमदनगर लाचलुचपतचे पथक मनातून प्रामाणिक पणे कार्यवाही करत नसल्याने नाशिक पथक जेव्हा जेव्हा अहमदनगर जिल्ह्यात आले तेव्हा तेव्हा त्यांनी खुप मोठ मोठ्या कारवाया यशस्वी केल्या आहेत मग ती अलीकडे शेवगाव तहसील कार्यालयातील किंवा नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन मधील कारवाई असेल अशा अनेक कारवाया या नाशिक येथील पथकाने यशस्वी केलेल्या आहेत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या सर्व गोष्टींना ( अपयशाला) कारणीभूत फक्त पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर हेच आहेत याचे सर्व अनुभव मी स्वतः अनेक वेळा तक्रार दार या नात्याने अनुभवले असल्याचे आव्हाड यांचे तक्रार आहे. 

त्याचबरोबर राज्यातील लाचलुचपत विभागाच्या सन १ जानेवारी २०२१ ते २८ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या कार्यवाहीचा (कामगिरीचा) आलेख आपल्या वेब साईट वरून पाहिला असता त्यामध्ये अहमदनगर विभागाची कार्यवाहीचा आलेख राज्यात घसरलेला आहे व या परिस्थितीला कारणीभूत फक्त आणि फक्त पोलीस उपअधीक्षक खेडेकर साहेब व त्यांचेच कार्यालयातील त्यांचे काही खास हस्तक आहेत. खेडेकर साहेब यांच्या कार्यकाळातील न्यायालयात सादर केलेले दोषारोपपत्र यात जाणीव पूर्वक पळवाटा ठेवण्याचा संशय मला आहे त्यामुळे याबाबत देखील चौकशी होणे आवश्यक आहे.  

गेली अनेक वर्षापासून खेडेकर साहेब हे नगर येथे रेंगाळल्या मुळे त्यांचे स्थनिक अधिकारीवर्गाशी आर्थिक हितसंबंध निर्माण झाले आहेत त्यामुळे जिल्ह्यात येथील कार्यालया बाबत मोठ्या प्रमाणावर उलट सुलट चर्चा सुरू आहेत त्यामुळे माझी एक प्रामाणिक तक्रारदार म्हणून आपल्याला विनंती आहे की, आपण तात्काळ या निष्क्रिय अधिकारी असलेल्या पोलीस उपअधीक्षक हरिष दत्तात्रय खेडकर यांची या पदावरून उचलबांगडी करून नवीन प्रामाणिक व कर्तव्यदक्ष चांगल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व खेडेकर यांच्या सह त्यांच्याशी या गैरकारभारात सहभागी असल्या बाबत व संपत्तीची उघड चौकशी करावी अशी विनंती किसन आव्हाड यांनी केली असून याबाबत संबधित विभाग कडून काय कार्यवाही होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .मात्र या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्सरकरणाची सखोल चौकशी करून संबधित अधिकारी जर यात गुंतलेले असतील तर अथवा केवळ बदली होईल हा त्यांचा भ्रमाचा भोपळा फोडून त्यांच्यावर कडक कार्यवाही करणे गरजेचे आहे तरच कायद्याचा धाक राहील अन्यथा जिल्ह्यात चुकीचा पायंडा पडू शकतो हे हि तितकेच खरे आहे. 

Post a Comment

0 Comments