आ.राजळे,ढाकणेच्या एकमेकांना दीपावली शुभेच्छा

                               

पाथर्डी - आज सायंकाळी पाथर्डी शहरात दिवाळी पाडव्यानिमित्त भाजपा आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे या दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत फिरून शहरातील व्यापाऱ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शुभेच्छा देत असतांना भाजपा आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे हे दोघेही नवीपेठेत समोरासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी दोघांनीही कार्यकर्त्यांबरोबर एकत्र फोटोसेशन करत परत आपापल्या मार्गाने निघून गेले. एरव्ही कायम राजकीय मुद्द्यावरून एकमेकांना लक्ष करणारे नेते समोर समोर येवून हसतमुखाने शुभेच्छा देताना पाहून बाजारपेठेत चर्चेचा विषय झाला होता. दरम्यान,आमदार मोनिका राजळे यांच्या बरोबर शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे जवळजवळ सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत होते.मात्र,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके हे दोघेही महत्वाचे नेते सोबत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज चालू होती. 

Post a Comment

0 Comments