![]() |
पाथर्डी पालिका कार्यालय |
पाथर्डी – ( हरिहर गर्जे ) पाथर्डी गावची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे गेल्या नंतर नागरिकांच्या वाढत्या मुलभूत गरजा लक्षात घेता ३० मे १९८५ रोजी शहराला पालिका लागू झाली. मात्र तत्पूर्वी शहरातील आजाद चौकातील ग्रामपंचायत कार्यालयातून पाथर्डी गावचा प्रशासकीय कारभार चालत असे,आज अखेर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पार्थ नगरीची ग्रामपंचायत ते पालिका घोडदौड जोमाने सुरु असली तरी देखील तुटपुंज्या साधन सामुग्रीने नागरिकांना सुविधा पुरवण्यात पालिका व्यवस्थापन कमी पडल्याचा दैनदिन अनुभव येत आहे.
१९८५ पूर्वी हंडाळवाडी,तनपुरवाडी,शिरसाठवाडी
अश्या शेजारील गावांचा देखील पाथर्डी ग्रामपंचायत मध्ये समावेश होत असे मात्र लोकसंख्या
१५ हजारांच्या पुढे गेल्या नंतर यापैकी शिरसाठवाडी वगळून पाथर्डी पालिका अस्तित्वात
आली.पाथर्डी ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच दिनकर पालवे हे होते. सुरवातीला तालुक्याचे
दळणवळण राज्य परिवहन मंडळाच्या बस द्वारे गावातील जुन्या बस स्थानकातून चालत असे, हल्ली उच्चभ्रू लोकवस्ती समजल्या जाणाऱ्या वामनभाऊनगर,आनंदनगर त्यावेळी अस्तित्वात नव्हते मात्र शहरात साईनाथनगर,इंदिरानगर,एडके वसाहतीचा
व उपनगरांचा समावेश शहरात होता मात्र वाढत्या लोकसंख्ये नुसार पाथर्डीला पालिकेचा शिक्का
लागला असला तरी आजाद चौकातील ग्रामपंचायतीच्या जुन्या पाच खोल्यात पालिकेचा कारभार
चालत असे, ग्रामपंचायत काळातील केवळ ८० कर्मचारी
पालिके कडे वर्ग झाले.
![]() |
पाथर्डी पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले जॉगिंग पार्क |
सार्वजनिक कार्यक्रमासाठी शहरात आताच्या सारखी अलिशान मंगल कार्यालय नव्हते,जुन्या गावातील राम मंदिर तसेच हिंद वस्ती गृहातून लग्न कार्य सार्वजनिक समारंभ होत असत. पालिका अस्तित्वात आल्या नंतर सुरवातीला तहसीलदार दर्जाच्या प्रशासकानी गावगाडा हाकला, तदनंतर १७ डिसेंबर १९९१ रोजी सुभाष दगडू घोडके यांनी पहिले नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला, घोडके यांनी त्यांच्या कार्यकाळात शहराला जायकवाडी तलावातून पाणी आणण्यासाठी लढा उभारला.दुसरे नगराध्यक्षपद शंकरराव मरळीकर,हिंद कुमार औटी यांनी भूषवले सुभाष घोडके यांच्या कार्यकाळात शॉपिंग सेंटरचा पायाभरणी झाली.
![]() |
पालिकेचे बंद अवस्थेतील गोपीनाथ मुंडे वाचनालय |
कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला बंद अवस्थेतील खोलेश्वर कुस्ती आखाडा व पार्किंग |
पालिकेचे बंद अवस्थेत असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे वाचनालय कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासह नवीन खेळाडू घडण्यासाठी स्वतंत्र क्रीडांगण, नवीन पाणी पुरवठा योजना,रस्ते,पथदिवे,सांडपाणी व्यवस्थापन, बकालवस्ती वाढू नये म्हणून नगररचना नियमानुसार बांधकामे आदी आवश्यक मुद्द्यावर नियोजन होणे आवश्यक आहे .याशिवाय ईतर वाढत्या गरजा लक्षात घेता नवीन आराखड्या नुसार सुविधा पुरवण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.२००५ सालच्या आकृती बंधानुसार पालिका कार्यालयात १३१ कर्मचारीना मंजुरी देण्यात आली परंतु ते आस्थाई पदे असल्याने निवृत्ती नंतर पदे भरली गेली नसल्याने आज रोजी पालिकेत आरोग्य,पाणीपुरवठा व कार्यालयीन कामासाठी फक्त ९७ कर्मचारी कार्यरत आहेत हे मनुष्यबळ वाढत्या लोकसंखेच्या तुलनेत फारच अपुरी असल्याने नागरी सुविधावर मोठा ताण पडत आहे.
0 Comments