पाथर्डी – ( हरिहर गर्जे ) साधू संत हे समाजातील अनिष्ट चालीरीतींना फाटा देवून योग्य दिशा दाखवण्याचे व योग्य उपदेश करण्याचे महान कार्य करत असतात याचाच प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील काळेगाव फकीर येथील ग्रामस्थांना आला असून संतांच्या आवाहनातून ग्रामस्थांनी तरुणपणी हृदयविकाराने मयत झालेल्या युवकाच्या कुटुंबियाच्या मदतीसाठी सामाजिक जाणीवेतून ७६ हजारांची मदत जमा केली असून यामुळे कर्मकांडात अडकलेल्या समाजाला खर्या अर्थाने दिशार्दशक संदेश मिळाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील काळेगाव फकीर येथील रविंद्र बाबासाहेब सातपुते वय २६ या युवकाचे गेल्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले होते,त्याच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने सद्गुरू जोग महाराज सेवा संस्थान, आखेगाव ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांचे प्रवचन सेवा सोमवारी दीपावलीच्या दिवशी आयोजित केलेली होती. मयत रवींद्र याच लग्न होऊन ३ वर्षच झालेले असताना त्याच्या अकाली निधनाने त्यांची पत्नी जयश्री वर संकट कोसळले ६ महिन्याची छोटी मुलगी व घरची परिस्थिती जेमतेम हे झिंजुर्के महाराजांना गावकर्यांकडून समजले. महाराजांनी मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून गांवकरी व नातेवाईक यांच्या सहकार्याने मयत कुटुंबाच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याचा निर्णय करत झिंजुर्के महाराजांनी स्वतः ११००० रुपये मदत म्हणून दिले.
यामुळे काळेगाव ग्रामस्थांना प्रेरणा मिळाली,महाराजांच्या
निर्णयाने मयताच्या कुटुंबियांची दिवाळी गोड झाली व सत्कार्यासाठी काम करावं
सत्कारासाठी नाही याचे मूर्तिमंत उदाहरण झिंजुर्के महाराजांनी सर्वा समोर मांडले आणि
बघता बघता काळेगाव ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या सहकार्याने आत्तापर्यंत ७६,०००रुपये
रक्कम जमा झाली असून १ लाख रुपये मदत निधी
जमा करण्याचा मानस ग्रामस्थांनी बोलून दाखवला आहे. या मदत निधीतून मयत रविंद्र
सातपुते यांच्या मुलीच्या भविष्यासाठी 'सुकन्या'
योजने मध्ये ठेव ठेवायचे असून ज्यांना
मदत करवायची आहे त्यांनी जरूर करावी असे आवाहन काळेगाव ग्रामस्थानी केली आहे.असे
उपक्रम गावोगाव राबवले गेले तर परंपरागत कर्मकांडाला फाटा मिळून निराधार कुटुंबाला
आर्थिक मदतिचा अनोखा पायंडा पडू शकतो असे वाटते.
0 Comments