अमित ठाकरेंची भगवान गडाला भेट



श्रीक्षेत्र भगवानगड परिसरात वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा असून संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला आहे आगामी काळात राज्याच्या धार्मिक निसर्ग पर्यटन क्षेत्रात गडावर भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल,अत्यंत नियोजनबद्ध दर्जेदार विकास कामे करत महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी देशाला गडाची नवी ओळख दिली अश्या भावना मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

श्रीक्षेत्र भगवानगड येथे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ठाकरे यांचे बीड जिल्ह्यातून वाजत गाजत आगमन झाले यावेळी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते मार्गावरील विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी ठाकरे यांना ज्ञानेश्वरीवरील विवेचनाची पुस्तके भेट दिली चर्चेदरम्यान महंत डॉक्टर शास्त्री यांनी गडाची परंपरा विकास कामे स्थापना आदिण बाबत माहिती दिली वैकुंठवासी भगवानबाबांच्या वापरलेल्या वस्तूंचा वस्तूंच्या संग्रहातील ठाकरे वस्तूंच्या संग्रहालयाची ठाकरे यांनी पाहणी केली परिसर स्वच्छता शांतता स्थान महात्म्य धार्मिक आध्यात्मिक कार्य ऐकून ठाकरे यांनी सर्व इतिहास बारकाईने जाणून घेतला.

 

Post a Comment

0 Comments