सभासदांचे मयत निधीतून परस्पर पैसे कपात करून फसवणूक - सुभाष खेडकर


पाथर्डी - सभासदांचे मयत निधीतून परस्पर पैसे कपात म्हणजे एक प्रकारची घोर फसवणूकच असल्याचे शिक्षक नेते सुभाष खेडकर यांनी प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक मतदार भेटी दौऱ्या दरम्यान सांगितले.


सत्ताधाऱ्यांनी सभासदांना विश्वासात न घेता मयत निधीमधून परस्पर सात हजार रुपये कपात केली व दीड वर्षानंतर पावत्या पोच केल्या.प्रचारादरम्यान सभासदांच्या कपातीबाबत कुठलीच माहिती नसल्याच्या प्रतिक्रिया सभासदांनी दिल्या. बँक ही सभासदांची कामधेनू असून ती कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही. पैसे कपातिबाबत सभासदांनी तीव्र नाराजी दर्शविली असून येत्या १६ तारखेला सभासद मतदानच्या रूपाने कपबशीला मतदान करून परिवर्तन करतील व सभासदाभिमुख कारभार करण्याची संधी सदिच्छा,बहुजन,शिक्षक संघ व साजीर महिला आघाडीला देतील असा विश्वास बँकेचे माजी व्हा.चेअरमन श्री.गहिनीनाथराव शिरसाठ यांनी मतदार जागृती अभियाना दरम्यान व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments