रघुनाथ नानासाहेब उघडे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर यांचा ट्रॅक्टर हा त्यांचे
राहते घरासमोरुन दि. २४/०६/२०२२ रोजी रात्री चोरीला गेला होता, त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन
श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ५५४ / २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा
दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत असताना, पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी, यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर ट्रॅक्टर चोरणारी टोळी श्रीरामपुर
परीसरात परत ट्रॅक्टर चोरीस येणार आहे, म्हणुन सदर बातमी मा. SDPO श्रीरामपुर यांना सांगुन, त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथक
रवाना करण्यात आले.
बातमीप्रमाणे सापळा लावुन, शिताफिने यातील चार आरोपींना तपास पथकाने
पकडले आहेत. त्यांना त्यांची ओळख विचारता त्यांनी त्यांचे नावे व पत्ते १ ) किरण शांताराम
लासुरे, वय २५ वर्षे, रा. शिंगवे, ता. राहता, जि. अहमदनगर, २ ) प्रल्हाद गोरक्षनाथ बरवंट, वय ४५ वर्षे, रा. शिंगवे, ता. राहता, ३) रामा बाळासाहेब यादव, वय २९ वर्षे, रा. १४ नं. चारी, राहता, ता. राहता, ४) मच्छिंद्र भाऊसाहेब गायकवाड, वय २७ वर्षे, रा. बाबतारा, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद असे असल्याचे कडुन सांगुन गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन त्यांचे कडे
तपास केला असता, त्यांचे दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, आर्मीचर व चार
मोबाईल असा एकुण १२,९०,०००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन, नाशिक जिल्ह्यातील १) वावी पोलीस स्टेशन
गुन्हा रजि. नं. २२९/ २०२२ भादवि कलम ३७९ तसेच २) श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३८६
/ २०२२ भादवि कलम ३७९ असे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मनोज पाटील साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा.
पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील
सपोनि जिवन बोरसे, पो.हे.कॉ. अतुल लोटके, पो.कॉ.गौतम लगड, पो.कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ. रमिझराजा अत्तार, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. गौरव दुर्गुळे, पो.कॉ.संपत बढे, पो.कॉ. मच्छिंद्र कातखडे, पो.कॉ. भारत तमनर यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन
बोरसे हे करीत आहेत.
0 Comments