पाथर्डी
- पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक ओमप्रकाश दहिफळे यांची दिवंगत दिव्यांग
मुलगी जुई दहिफळे हिच्या स्मरणार्थ मुक बधीर विद्यालय पाथर्डी येथील दिव्यांग अनाथ
मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना पाथर्डी सारख्या दुष्काळी भागात कल्पनाही करवत नाही असे
दिव्यांगासाठीचे कार्य नवज्योत महिला सेवा संस्था पदाधिकारी यांनी मुक बधीर
विद्यालयाच्या माध्यमातुन नेटाने पुढे नेले व या कार्यासाठी समाजातील ओमप्रकाश
दहिफळे यांच्या सारख्या सामाजिक जाणिव असणाऱ्या समाजसेवकांची मदत होत आहे असे जेष्ठ
पत्रकार अविनाश मंत्री यांनी प्रतिपादीत केले.
या प्रसंगी नगरसेवक प्रसाद आव्हाड, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे संचालक सुधिर खेडकर, उद्योजक संतोष एडके, बांधकाम व्यवसायिक नितीन एडके,सामाजिक कार्यकर्ता धनंजय थोरात, वनपाल देवकर साहेब,सुभाष केदार,रामदास आव्हाड,अमोल गिते, मुकुंद आंधळे, संस्थेचे मार्गदर्शक नंदकुमार डाळींबकर तसेच शाळेचे कर्मचारी हजर होते.सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदिप भोसले यांनी केले.
0 Comments