पाथर्डी- तालुक्यातील डांगेवाडी परिसरातील खवले वस्ती नजीक
पाथर्डी शेवगाव रोडवर जाणाऱ्या वाहन चालकाला रस्त्यावर अचानक भलामोठा बिबट्या
दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली, मात्र घाबरलेल्या अवस्थेतही या वाहन चालकांनी सदरील बिबट्याचे छायाचित्रण आपल्या मोबाईल मध्ये करून परिसरातील नागरिकांना सावधान राहण्याबाबत सूचना दिली आहे.
पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे अस्तित्व वारंवार अधोरेखित होत असून बिबट्याकडून शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी शिकार होत आहेत,तालुक्यातील दुलेचांदगाव, माळेगाव,वाळुंज,डांगेवाडी,साकेगाव,कासार पिंपळगाव तसेच माणिकदौंडी घाट, चितळवाडी,शिरसाटवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्यांकडून वारंवार शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले चढवले जात आहे.मात्र वनविभागाकडून केवळ खबरदार राहण्याच्या सल्ल्याशिवाय कुठलीही सबळ कार्यवाही होत नसल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तालुक्यातून नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यात बिबट्याचे अस्तित्व खुलेआम झाले असून बिबट्या आता तालुक्यातील रस्त्यावर देखील अगदी निडर होऊन फिरू लागला आहे.
0 Comments