दिनांक
३० ऑक्टोबर रोजी फिर्यादि
सौ.रुखमीणी अशोक वारे रा.जोडमोहोज,ता.पाथर्डी,जि.अ.नगर या बसने तीसगाव ते भिंगार बस
स्टँड,अ.नगर प्रवास करत होत्या यावेळी त्यांनी
त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने ४०,०००/- रु किमतीचे दोन तोळे सोन्याचे नेकलेस,२०,०००/-
रु किमतीचे एक तोळा सोन्याचे नेकलेस,२०,०००/- रु किमतीचे एक तोळा वजनाची सोन्याची
चैन,४०,०००/- हजार रुपये किमतीचे दोन तोळे
वजनाचे सोन्याचे गंठण,७,०००/- हजार रुपये किमतीचे तीन ग्रँम वजनाची सोन्याची अंगठी,२०,०००/-
रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे मनी, १०,०००/- हजार रुपये किमतीचे पाच ग्रँम
वजनाच्या सोन्याच्या गळ्यातील शिंपल्या असा एकूण १ लाख ५७ हजार रुपये किमीचा ऐवज पर्स मध्ये ठेवला होता मात्र तीसगाव ते भिंगार बस स्टँड दरम्यान एसटी बस ने
प्रवास करत असताना फिर्यादी शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महीलांनी फिर्यादी यांच्या
पर्स मधील वरील वर्णनाचे सोन्याचे दागीने स्वताचे फायदे करीता लबाडीच्या इराद्याने
चोरुन नेले बाबत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान पाथर्डी ते नगर बस प्रवास दरम्यान आज
पर्यंत अनेकदा अश्या स्वरूपाच्या महिला चोर प्रवाश्यांचे दागिने चोरत असून त्यांचा
तपास लागत नसल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.
0 Comments