सुवर्णयुग कडून घरासाठी आर्थिक मदत


पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने सामाजिक जबाबदारीचा वारसा जपत पुन्हा एकदा शहरातील गत काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी मुळे घराची पडझड होवून नुकसान झालेल्या निराधार पंडित कुटुंबाला घराच्या दुरुस्ती साठी आर्थिक मदत केली आहे.   

पाथर्डी शहरातील इंदिरानगर येथील मंगल नवनाथ पंडित या गरीब महिलेच्या घराची काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये मोठी पडझड होऊन नुकसान झाले होते.मंगल पंडित व त्यांचा पंधरा वर्षाचा मुलगा हे दोघेजण घरात राहतात.पतीच्या निधनानंतर मंगल पंडित यांच्यावर आपल्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आहे त्या घरकाम करून आपलं कुटुंब चालवतात.आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने पुन्हा घर बांधणे मोठ्या अवघड झाले होते.याची माहिती सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाच्या सदस्यांना मिळाल्यानंतर या कुटुंबाला मंडळाकडून रोख स्वरूपात पाच हजाराच्या आर्थिक मदत देण्यात आली. 

पंडित यांना घराची दुरुस्तीची तातडीने गरज होती परंतु आर्थिक परिस्थिती नसलेल्या  त्यांना हे संकट मोठे वाटत होते.याच वेळी मंडळाचे सल्लागार ईजाज शेख यांनी मंडळाला या बाबतीत कळवले. सदर कुटुंबाची माहिती घेऊन मंडळाने आपत्ती व्यवस्थापनासाठी रोख पाच हजारांची मदत मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष ओम डागा,सचिव,शाहरुख शेख,खजिनदार,राहुल भगत व सल्लागारईजाज शेख  यांनी मंडळाच्या वतीने सुपूर्द केली.या सामाजिक कार्याची वेळ दाखल घेऊन आर्थिक मदत केल्याबद्दल सर्व स्तरातून सुवर्णयुग तरूण मंडळाचे कौतुक होत आहे. अन्य व्यक्तीनी हि या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.सुवर्णयुग तरूण मंडळाने केलेली मदत ही आमच्यासाठी लाखमोलाची आहे.आमचं पूर्ण कुटुंब दुसऱ्याकडे रोजंदारीवर काम करुन उदरनिर्वाह भागवतो.अशा परिस्थितीत आमच्यावर निसर्गाचं संकट वाढवलं या संकटातून मार्ग काढण्यासाठी सुवर्णयुग तरूण मंडळ मदतीला धावून आलं.

 

Post a Comment

0 Comments