करंजी - दिवाळी म्हटले की,
फराळ आलाच,याच संधीचा फायदा आता नेते, राजकारणी मंडळी घेत असुन अनेक राजकिय नेते आपल्या समर्थकासाठी दिवाळीच्या फराळाचे नियोजन करित आहेत. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील चिंचोंडी येथील शिवनेरीवर माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी उद्या आयोजित केलेल्या फराळाची मात्र वेगळीच चर्चा या भागात चालु आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी ठेवलेल्या फराळाची चव काही न्यारीच असणार यात शंका नाही. मिरी जिल्हा परिषद गट व करंजी गणात त्यांना ओळणारा व मानणारा एक गट आहे यातही शंका नाही. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील ३९ गावे राहुरी मतदार संघाला गेल्या १३ वर्षापासुन जोडलेली आहेत.राहुरी-नगर-पाथर्डी या मतदार संघावर सलग १० वर्ष माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सत्ता भोगली. मागील निवडणुकीत राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांनी विजयश्री खेचून आणीत आ. शिवाजीराव कर्डिले यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. पहिल्याच वेळी आमदार झालेल्या तनपुरे यांना मंत्रिपदही मिळाले. त्यांना विजयी करण्यात पाथर्डी तालुक्यातील मतदारांचे, कार्यकर्त्यांचे मोठे योगदान होते.
.jpeg)
कर्डिले यांना १८-२० हजार मताचे लीड देणाऱ्या या भागातील मतदारांनी आमदार कर्डिले यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्याना अवघ्या हजार, दिड हजार मतांच्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले,
परिणामी कर्डिले यांची बालेकिल्ल्यातच पिछेहाट झाल्याने त्यांचा मोठा पराभव झाला. त्यावेळी कर्डीले यांची साथ सोडुन अनेक लहान-मोठ्या कार्यकर्त्यांनी आमदार तनपुरे यांना मदत केली. पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांचाही मोठा वाटा होता. त्यांनीही आमदार तनपुरे यांचे नेटाने काम केले होते. आमदार तनपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणुन त्यांना ओळखले जाते.

आमदार तनपुरे यांच्याबरोबर सावलीसारखे राहणारे पालवे यांची गेल्या काही दिवसापासुन आमदार तनपुरे यांच्या कार्यक्रमातील गैरहजेरी बरेच काही सांगुन जाते. आ.तनपुरे मंत्री होताच या भागातील त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी वाढ झाली. अनेक कर्डीले समर्थकांनी आमदार तनपुरे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे जुन्या व संकटकाळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांची घुसमट होवु लागल्याचे लपून राहिले नाही.कार्यकर्त दबक्या आवाजात आपल्या व्यथा एकमेकात मांडु लागले.नको ते कार्यकर्त, राजकारणात नवखे कार्यकर्त पुढे आले. निष्ठावान समर्थकात नाराजीचा सुर निघु लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी चिचोंडी येथे शिवनेरी मंगल कार्यालयावर ठेवलेल्या फराळाचा आस्वाद मात्र वेगळाच असणार यात शंका नाही.
0 Comments