मोहटादेवीला नवरात्रोत्सवात दोन कोटींचे दान



पाथर्डी -  कोरोना नंतर यंदा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाल्याने सुमारे नवरात्र कालावधीत लाखो भाविकांनी मोहटा देवीचे मनोभावे दर्शन घेत देवस्थानच्या दानपेटीत कोट्यावधी रुपयांचे दान दिले असून नुकत्याच देवस्थानने केलेल्या मोजदाद मध्ये दोन कोटी रुपये दान पेटीत जमा झाल्याचे देवस्थानने सांगितले आहे.

पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी भाविकांच्या नवसाला पावणारी जगदंबा मोहटादेवी जागृतदेवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवस्थानचे दानपेट्यामधील सोने चांदीसह रोख रक्कमेची मोजदाद नुकतीच धर्मादाय आयुक्त यांचे प्रतिनिधी डॉ. डी. एस. आंधळे, देवस्थान विश्वस्त, बॅक अधिकारी, पाथर्डी येथील शेवाळे सराफ कर्मचारी यांनी पोलीस सुरक्षा व सीसीटीव्ही चे निगराणीमध्ये केली. यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी २७ लाख ६० हजार ५५४, अशुद्ध सोने ४० तोळे अंदाजे मूल्य १६ लाख ६४ हजार, अशुद्ध चांदी वस्तू १३ किलो ८१० ग्रम मूल्य ५ लाख १३ हजार ९९२ मात्र, चांदीचे छत्र व पंचारती मूल्य ३ लाख मात्र, तसेच विविध देणगी पावती ४० लाख २९ हजार ९३०, ऑनलाइन स्वरुपात देणगी ४ लाख ८६ हजार २०३ रुपये प्राप्त झाले.


मुंबई येथील देवीभक्त उद्योजक बाबूराब सांगळे यांनी देवस्थानास ३ लाख रुपये किमतीची अद्यावत सी सी टी वी सिस्टम देणगी स्वरुपात अर्पण केली. अशा विविध स्वरुपात रुपये २ कोटींच्यावर देणगी देवस्थानास प्राप्त झाली. नवरात्रोत्सव यशस्वी होणेसाठी अहमदनगर प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर येलगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त भीमराव पालवे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, आजिनाथ आव्हाड, श्रीमती सरिता दहिफळे, अँड.विजयकुमार वेलदे, अँड. सुभाषराव काकडे, सतीश वैद्य, सुधीर लांडगे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी नवरात्र कालावधीत भाविकांच्या सुविधे साठी विशेष प्रयत्न केले देवस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत संपन्न होणे करिता विविध विभागांनी, संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, भाविक भक्त, ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

Post a Comment

0 Comments