ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हा !

 


 

पाथर्डी - “ओवी ज्ञानेशाचीही ज्ञानेश्वरी ग्रंथातील वैज्ञानिक ओव्यांवर आधारीत स्पर्धा परिक्षा 2020, 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. याही वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारीत ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. विज्ञानरूपी ज्ञानेश्वरी अभ्यासण्यासाठी ओवी ज्ञानेशाचीया स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हा असे आवाहन आयोजक ङ बाळासाहेब बोडखे यांनी केले आहे. 

या स्पर्धेत स्पर्धेकाने संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामधील कोणत्याही तीन ओव्या निवडायच्या आहेत, की ज्यामध्ये वैज्ञानिक विचार, कल्पना, शोध, दृष्टांतरूपात मांडलेला आहे, अशा ओव्या निवडायच्या आहेत. वैज्ञानिक स्वरूपाच्या, ओव्या, रसायनशास्ञ, भौतिकशास्ञ, खगोलशास्ञ, भुगोल, पर्यावरण, जीवशास्व, आरोग्यशास्ञ, स्वच्छता, औषधशास्ञ, शरीरशास्ञ, मानसशास्ञ, व इतर कोणत्याही वैज्ञानिक स्वरूपाच्या शास्ञाशी निगडित असाव्यात. 

वैज्ञानिक ओव्यांचे विश्लेषण पुढील मुददयावर करणे बंधनकारक आहे. अ. (1) अध्याय क्रमांक, (2) श्लोक क्रमांक, (3) ओवी क्रमांक, आणि (4) ओवी लिहीणे आवश्यक आहे. अध्याय क्रमांक, श्लोक क्रमांक, ओवी क्रमांक आणि ओवी लिहीतांना लिहीतांना (5) शुध्दलेखन असणे बंधनकारक आहे. ( प्रत्येक मुदयास 2 गुण असे एकुण 10 गुण) (ब) अन्वयार्थ :- प्रत्येक ओवीचा अन्वयार्थ लिहावा, म्हणजे शब्दश: अर्थ लिहावा. (10 गुण), (क).प्रत्येक ओवीमध्ये कोणते विज्ञान सांगीतलेले आहे त्याचे अचुक व संपूर्ण विश्लेषण लिहीणे आवश्यक आहे. तसेच ओवीमध्ये सांगीतलेले विज्ञान आधुनिक विज्ञानाशी कसे निगडित आहे त्याबाबत अचुक, संपूर्ण माहितीसह, पुराव्याच्या संदर्भासह विश्लेषण करणे आवश्यक आहे. मोघम स्वरूपाचे विश्लेषण असु नये. (40 गुण), (ड) निवडलेल्या प्रत्येक ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी सांगीतलेला वैज्ञानिक दृष्टांत कोणता आध्यात्मिक सिंध्दात पटवून देण्यासाठी सांगीतला आहे यांचे अचुक व आवश्यक शब्दांमध्ये विश्लेषण करणे आवश्यक आहे. (20 गुण), (इ). निवडलेल्या तीन ओव्याबाबत स्पर्धेकाचे चर्चात्म स्वरूपाचे स्वत:चे मत. स्पर्धेकाने मत व्यक्त करतांना स्पर्धेसाठी निवडलेल्या तीन ओव्याबाबतच मत व्यक्त करावे. व्यक्त केले जाणारे मत हे स्वत:चे विचार असावेत असे अपेक्षित आहे. आजच्या युगात ज्ञानेश्वरी मार्गदर्शक आहे की कालबाहय याबाबत देखील मत सकारण व्यक्त करावे. (20 गुण) अशी 100 गुणांची परिक्षा असेल.

स्पर्धेकाने स्वत:चे ओवी विश्लेषण वरील निकषानुसार स्वहस्ताक्षरात किंवा टंकलेखन करून पोष्टाने बंद लिफाफा मध्ये खालील पत्यावर विहीत मुदतीत पोहोचतील अशा बेताने पाठवावे. पोष्टाने पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. पत्ता ङ बाळासाहेब बोडखे, ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परिक्षा कार्यालय, विठठ़ल रूख्मीणी मंदीरा शेजारी, मु.पो. खिळद ता. आष्टी जि. बीङ 414208. ज्यांना पोष्टाने किंवा समक्ष देणे शक्य नाही त्यांनी मोबाईल नंबर 9423471312 किंवा ईमेल आयडी bodkhebs@gmail.com वर स्कॅन करून पीडीएफ (pdf) स्वरूपात ऑनलाईन पाठवावे . 

स्पर्धेकाने ओवी विश्लेषण दिनांक 05 ऑक्टोबर 2022 पासुन ते दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत पाठवावेत. ओवी ज्ञानेशाची या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येणारास रू.5001/- रोख रक्कम, दुसरा क्रमांक येणारास रू.3001/- रोख रक्कम, आणि तिसरा क्रमांक येणारास रू.2001/- रोख रकमेचे बक्षिस, प्रशस्तिपञ, ज्ञानेश्वरी ग्रंथ, शाल, श्रीफळ देवून संत, महंतांच्या, जेष्ठांच्या हस्ते गौरविण्यात येईल.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सहआयोजक श्री. देविदास महाराज 942579660, पांडुरंग गर्जे 9922229695, यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत तरूण, विदयार्थ्यी, वारकरी, वाचक, श्रोते, साधक, टाळकरी, माळकरी, अभ्यासक, किर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असे सर्वजण सहभागी होउ शकतात. थोडक्यात या स्पर्धेत कोणीही सहभागी होवू शकतात. विज्ञानरूपी ज्ञानेश्वरी अभ्यासण्यासाठी ओवी ज्ञानेशाचीया स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हा असे आवाहन आयोजक ङ बाळासाहेब बोडखे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments