पाथर्डी - मा.नगरसेवक रामभाऊ बंग हे प्रभागा सह शहरातील विविध प्रश्न तत्परतेने सोडणारे नेतृत्व असून प्रभागातील कामासंदर्भात एक फोन केल्यानंतर ते काम करण्यासाठी पुन्हा फोन करावा लागत नाही, कारण तत्परतेने ते काम झालेलेच असते, अशी रामनाथ बंग यांची काम करण्याची चांगली पद्धत आहे, असे गौरवोद्गार सुवर्णयुग तरूण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक, व्यापारी राजेंद्र शेवाळे यांनी काढले.
सुवर्ण युग तरुण मंडळ शेवाळे गल्ली पाथर्डी, यांना त्यांच्या सामाजिक, गणेश उत्सवातील समाज प्रबोधन आदी उत्कृष्ट कामाकरता महाराष्ट्र शासनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले,त्याबद्दल माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्रमंडळाच्या वतीने आयोजित
सत्कार सन्मान सोहळ्यात सुवर्ण युग तरुण
मंडळाचा सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करताना ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड होते.ते पुढे
म्हणाले, रामभाऊना माणसं जोडण्याची उत्तम कला असून
सर्वांना सहकार्य करण्यात ते सतत पुढे असतात.
यावेळी वैभव शेवाळे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयकाका आव्हाड यांनी सुवर्ण युग तरुण मंडळ आणि रामनाथ बंग मित्र मंडळास उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.हुमायून भाई यांनी पाथर्डीच्या पूर्वीच्या गणपती उत्सवाची माहिती, पारंपरिक पद्धत, संस्कृती याबद्दल ओळख करून दिली.सुवर्णयुग तरुण मंडळ हे माझ्या प्रभागात येत असल्यामुळे मला त्याचा विशेष अभिमान आहे, तो पुरस्कार जणू आम्हालाच मिळाल्याचा आनंद असल्याची अनुभूती माझ्यासह पाथर्डी शहरवासियांना आहे असें उदगार मा. नगरसेवक रामनाथ बंग यांनी काढले.
महंत प. पु. माधवबाबा, पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
अभयकाका,भैरवनाथ मंदिराचे दादासाहेब मर्दाने, पत्रकार अविनाश भाऊ मंत्री, राजेंद्र जहागीरदार साहेब, राजेंद्रजी दुधाळ, प्रथम महिला नगराध्यक्षा सौं रत्नमाला
ताई उदमले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी सुवर्ण युग तरुण मंडळा चे मार्गदर्शक राजूभाऊ शेवाळे, वैभव शेठ शेवाळे, ओम डागा, बंडूशेठ दानापुरे, दिगंबर जोजारे, भैया गांधी, अमोल कांकरिया, शाहरुख शेख,अनिल खाटेर सह सर्व सदस्य,रामनाथ बंग, सौं दिपालीताई बंग व रामनाथ बंग मित्रमंडळाचे सदस्य, महिला समाजसेविका सुनीता ताई उदबत्ते, भारतीताई असलकर आदिनी सन्मान केला. यावेळी मंडळाचे
सुंदर मामा कांबळे,सुनील चिंतामणी,शरद काळे,गोपाल हारकूट, मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ बजाज,भुमिका पेपरचे संपादक नंदकुमारजी दायमा, दिलीप काका राऊत,प्रशांत रोडी साहेब,संजय कुलकर्णी सर,सचिन मुनोत,शंकर पंडित,तुषार दारके साहेब,सचिन रत्नपारखी,प्रफुल चिंतामणी,सागर बागडे,सलिम भाई शेख,अमोल आखडकर,अशोक येळाई,गजानन नाकिल,गोविंद भागवत,जगदीश टाक,दत्तात्रय हडदे,विजय राठोड,बाळु काका दायमा,बबलू पा वावरे,आलोक बंग हे सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे
प्रास्तविक तुषार दारके यांनी केले तर सूत्रं संचालन प्रशांत रोडी यांनी केले व
आभार शंकर पंडित यांनी मानले.
0 Comments