पाथर्डी : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार वाघोली येथील भाऊसाहेब नामदेवराव साबळे यांना प्रदान करण्यात आला. मुळचे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील अंभोळ गावचे रहिवासी असलेले साबळे हे पुणे येथे जेएसपीएम शिक्षण संस्थेत ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापक आहेत. यापूर्वी त्यांना साहित्यसंपदा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, विश्वस्त रुषीराज सावंत तसेच,संचालक सचिन आदमाने व प्राचार्या शिल्पा युनानी आदींनी पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments