शेवगाव - तालुक्यातील वाघोली येथील महिलांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत शेवगाव पोलिसांना वाघोली गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री बंद करण्या बाबत निवेदन दिले असून याबाबत पोलिसांनी दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शेवगाव
तालुक्यातील वाघोली गावातील अवैधपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करण्यासाठी
ग्रामपंचायत वाघोली येथील सरपंच बाबासाहेब घाडगे उपसरपंच जमेराताई पवार ग्रामसेवक
जनाबाई फटाले यांनी मासिक सभेत १७ ऑक्टोबर २२ रोजी ठराव केला होता. याबाबत सविस्तर
माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील मौजे वाघोली येथील ग्रामसभेत चर्चा झाली असता
गावातील खालील सह्या करणाऱ्या सर्व नागरिक व महिला पुरुष यांनी गावातील अवैध दारू
विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभेत मागणी केली होती. त्यानुसार सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दारूबंदी
विक्री बंद करण्याचा ठराव करण्यात आला.
आज दिनांक शनिवार २९ रोजी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये वाघोली येथील महिला व पुरुषांनी येऊन शेवगाव पोलीस निरीक्षक यांना यासंबंधीचे लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, अवैध दारू विक्रीमुळे गावातील नवयुवक वर्ग ही व्यसनाधीनतेच्या मार्गाकडे चालला आहे, तसेच महिला चे संसार उघड्यावर पडण्याची भीती निर्माण झालेली आहे, पोलीस खात्याकडून ही दारू विक्री बंद करण्यात आली नाही तर रस्ता रोको आंदोलन उभे करू, येत्या आठ दिवसाच्या आत पोलीस खात्याकडून संबंधित दारू विक्रेत्यावर कारवाई करून दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता ' रस्ता रोको' आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांनी दिला.
0 Comments