श्रीरामपुर - शहर पोलीस
स्टेशनच्या हद्दीत टिळकनगर कडुन श्रीरामपुरचे दिशेने विना नंबरचे पांढऱ्या
अॅक्टीवा गाडीवर येणाऱ्या दोन संशयित
आरोपी कडून श्रीरामपुर शहर पोलीसांच्या पथकाने शिताफीने गावठी कट्टा व त्यामधील गोळ्या जप्त
केल्या आहेत.
श्रीरामपुर ते संगमनेर जाणारे रोडवर हॉटेल कैलास समोर ८.१५ वा.सुमारास संगमनेर रोड कडुन अचानक एक
पांढऱ्या रंगाची विना नंबर अॅक्टीवा गाडी आल्यावर पोलीस तपास पथकाने जीवाची
पर्वा न करता,
शिताफीने सापळा लावुन, त्यांचेवर झडप घातली व त्यांना ताब्यात
घेतले.त्यांचे पैकी एकाचे कमरेला एक गावठी कट्टा,एक मॅगझिन व एक जिवंत राऊंड
मिळुन आला.सदर बेकारयदेशी कट्टा बाळगणाऱ्या इसम हे १) गौरव संजय रहाटे,वय २२ वर्षे, रा. दत्तनगर, ता. श्रीरामपुर २) रुपेश किरण जाधव, वय १८ वर्षे,
रा. कामगार
हॉस्पिटल,
वॉर्ड नं. ६, श्रीरामपुर असे असल्याचे तपासात
निष्पन्न झाले आहे. त्यांचेवर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.
९७६/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला असुन,
त्यांचेकडुन एकुण १,०१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यातील
आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.यातील इसम
नामे गौरव संजय रहाटे याचेवर पाच गंभीर गुन्हे दाखल असून
पैकी एका गुन्हयात गौरव संजय रहाटे
हा फरार होता.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब,
मा. अपर पोलीस
अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग,
संदिप मिटके
यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी,
श्रीरामपुर शहर
पोलीस स्टेशन यांचे आदेशाने तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे,पो.ना.रघुवीर कारखेले, पो.कॉ.गौतम लगड,पो.कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ.रमिझराजा अत्तार, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ.गौरव दुर्गुळे, पो.कॉ. मच्छिंद्र कातखडे, पो.कॉ.भारत तमनर व अपर पोलीस अधीक्षक
कार्यालय श्रीरामपुर येथील पो.ना.फुरकान शेख यांनी
केली असुन,
दाखल गुन्ह्याचा
अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन
बोरसे हे करीत आहेत.
0 Comments