करंजी - स्त्रियांना समान हक्क देण्याच्या आजच्या काळातही स्त्रियांवरील अत्त्याचार थांबलेले नाहीत. "घरकामासाठी माहेरहून १० हजार रु. घेवुन ये" नाहीतर ठार मारु अशी धमकी घाटसिरस येथील गृहिणीला ती सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी दिल्याची तक्रार पाथर्डी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादीच्या फिर्यादी नुसार श्रुतिका संदिप मिसाळ (वय २२ वर्ष) रा. नारायणडोह ता.अहमदनगर, हल्ली घाटसिरस ता. पाथर्डी, जि. अहमदनगर या घरकाम करणाऱ्या महिलेस तिचे पती संदिप सुभाष मिसाळ सासु जिजाबाई सुभाष मिसाळ,सासरे सुभाष किसन मिसाळ, भाया महादेव सुभाष मिसाळ, जाव ज्योती महादेव मिसाळ, आजीसासु जनाबाई किसन मिसाळ, नणंद संगीता संभाजी डमाळे सर्व रा. नारायणडोह ता. जि. अहमदनगर यांनी श्रृतिका हिस घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून १० हजार रु. घेवुन ये म्हणुन तिला उपाशीपोटी ठेवुन तिचा मानसिक, आर्थिक, व शारिरीक छळ केला. फिर्यादी श्रृतिका हिच्या अंगावरील दागिने काढुन घेवुन तिला घराच्या बाहेर काढुन दिले. तु माहेरहुन पैसे घेवुन आली नाही तर आम्ही तुला जिवे ठार मारु अशी धमकी दिली. याबाबत श्रृतिका हिने वरील सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे. पाथर्डी पोलिस स्टेशनला भा.द.वि. कलम ४९८(अ),३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पो.नि. सुहास चव्हाण, हे.काॅ.अरविंद चव्हाण, सतिष खोमणे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments