तिसगाव –
घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचे तिसगाव येथे भरदिवसा घर फोडी करत अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून
नेह्ला आहे.
सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार सिताराम गाडगे हे पत्नी व मुला समवेत तिसगाव येथील माधवनगर
येथे राहत असुन रविवार दिनांक दि.20/11/2022
रोजी दुपारी 11.45 वा.चे
सुमा.फिर्यादी व त्यांची पत्नी सुनिता असे जोडमोहज येथे कार्याक्रमा करीता गेलो होते
तर त्यांचा मुलगा आदित्य हा करंजी येथे कामा निमित्त गेला होता. त्यांनी जातांना घराला
कुलूप लावले होते मात्र मुलगा आदित्य हा 1.00
वाजण्याच्या सुमारास परत आला तेव्हा
घराची कडी कोंडा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील बेडरुमधील कपाटाची उचका पाचक
करून कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अडीच तोळा वजानाचे सोन्याचे साखळीचे गंठन,
पाच ग्रॅम वजानाचे सोन्याचे गंठनमधील पदक, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या कानातील
रिंगा,एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातील झुंबरचे दोन जोड असे साधारण २ लाख रुपये
किमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोराने चोरी केली असून सदरील चोरीची घटना
व चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून
गुन्ह्याचा पुढिल तपास स.पो.नि.कौशलरामनिरंजन वाघ हे करीत आहेत.
0 Comments