माणिकदौंडीचे पोलीस पाटील वाघमारे यांना सेवारत्न पुरस्कार

                                    

पाथर्डी - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट या संस्थेचा वतीने दिल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या संवर्गातील राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कार २०२२ माणिकदौंडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथील पोलीस पाटील वसंत अशोकराव वाघमारे यांना देण्यात आला.

राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ च्या २२ व्या वर्षातील राज्यातील विवीध क्षेत्रातील २७ पुस्कार प्रदान करण्यात आले, या वेळी सुप्रसिद्ध विचारवंत ह.भ.प.  शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांचे हस्ते तथा संस्थेचे अध्यक्ष ॲड. जगदाळे साहेब, समाज सेवक तात्यासाहेब रसाळ, सौ. मोनीका यशोद यांचे उपस्थीतीत हा अभुतपुर्व सोहळा पुणे शहरातील होटेल पुनम येथे पार पडला.या पुरस्कार सोहळ्यासाठी पोलीस पाटील वसंत वाघमारे यांचे सह त्यांचे कुटुंब माणिकदौंडी चे तलाठी राजु मेरड,अरुणोदय प्रतीष्ठाणचे राहुल मोरे माणिकदौंडी गावचे उप सरपंच समीर पठाण क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे वंशज रोहीत भाऊ साळवे (पुणे) तसेच स्नेही सतीष घोडके व अनिल घोडके उपस्थीत होते.या वेळी बोलताना पुरस्कारार्थी वसंत वाघमारे यांनी सांगितले की हा माझ्या जिवनातील सर्वोच्य पुरस्कार असुन या पुरस्कारापासुन आगामी कामासाठी खुप मोठी प्रेरणा मिळणार असुन संस्थेचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments