पाथर्डी - शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ६१ चे काम रखडल्या मुळे पाऊस संपल्या नंतर उघडी माती मधून उडणाऱ्या धुळीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून असून येथील उद्योग धंदे अडचणीत आले असल्याने या धुळीवर कायमचा उपाय करावी अन्यथा भिक मागो आंदोलन करण्याचा इशारा शहरातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाला दिला आहे.
याबाबत पाथर्डी येथील उपविभागी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना अरविंद सोनटक्के, अशोक सोनटक्के, नितीन मोरे, जालिंदर बोरुडे, शंकर बोरुडे ,मुबीन शेख ,कारभारी मोरे ,विशाल दहिफळे, संतोष थोरात, कल्याण घुले, धनंजय बांगर, संदीप हांगे, सावता सोनटक्के आदींनी निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ वर पाथर्डी शहरातील राहणारे नागरीक रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे वैतागले आहेत. खडडे व धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीचे प्रचंड लोट आमच्या घरा दारात व व्यवसायीक ठिकाणी येत असल्याने विक्रीसाठी आणलेल्या मालाचे नुकसान होवून जगणे मुश्कील झाले आहे.महामार्ग कार्यालयावर वेगवेगळया कार्यकत्यांनी व सामाजिक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. पण त्याला कार्यालय दाद देत नाही.
तरी
राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाथर्डी शहरातील कोरडगाव रोडवरील लक्ष्मी आई मंदिर ते
विजय लॉन्स हा रस्ता तातडीने खडडे व धुळ मुक्त करावा. प्रचंड प्रमाणात धुळ उठत
असल्या कारणाने त्याच्यावर तातडीने ठेकेदाराला पाणी मारण्याच्या सुचना करण्यात
याव्यात व खड्डे तातडीने भरण्यात यावे असे न केल्यास राष्ट्रीय महामार्गच्या
विरोधात भिक मागो आंदोलन करुन त्यातुन मिळालेला निधी सदर कामावर खर्च
करण्यात येईल. २३ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments