करंजी - अहमदनगर
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालयाने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. या
परिक्षेत विद्यालयाचे २१ विद्यार्थी पास झाले. यामध्ये पुर्व उच्च माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षेत १२ तर पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ९ विद्यार्थी
पात्र झाले आहेत.
पुर्व उच्च माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व रामदास शिंदे,
सिध्दार्थ कैलास साखरे, आयुष सुनिल गोरे, अकोलकर आर्या संतोष, व पुर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षेत पावले प्रद्युम्र प्रविणकुमार,
नरवडे प्रणव उध्दव विषेश गुणांसह
उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एस. पी. अकोलकर, पर्यवेक्षक भाकरे आर.
एन. यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक सागर घोरपडे, ऋषीकेश गर्जे, श्रीमती फलके, शिंदे सी. आर.,ए. एन. खोडके, श्रीमती कार्ले यांचे मार्गदर्शन लाभले. अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार
झावरे, सचिव जी. डी. खानदेशे,
उपाध्यक्ष रा. ह. दरेकर, सहसचिव ॲड.
विश्वासराव आठरे, सदस्य अरविंद आठरे,
बाळकृष्ण मरकड, चंद्रकांत म्हस्के
यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments