देवराईचे सुपुत्र निलेश पालवे यांची MPSC मार्फत निवड

                                             

पाथर्डी - पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन Excise Inspector (राज्य उत्पादन शुल्क) पदी पोहोचण्यात यशस्वी होऊन नवा आदर्श निर्माण करणारे पाथर्डी तालुक्यातील देवराई गावचे सुपुत्र निलेश बाजीराव पालवे यांच्या वर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लष्कराच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर निलेश पालवे यांनी राज्य सेवा परीक्षेच्या तयारीत स्वतःला झोकून देत वडील आजारी असताना आणि कुटुंबातील असंख्य अडचणींना तोंड देत त्यांनी हे राज्य सेवा परीक्षेत यश संपादन करून तरुणांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. माजी सैनिक व एन.एस.जी.कमांडो म्हणून निवृत्त झालेले निलेश बाजीराव पालवे यांनी निवृत्तीनंतर खडतर परिश्रम करून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत मोठं यश मिळवले असून त्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

पालवे यांचे प्राथमिक शिक्षण देवराईच्या प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण श्री वृद्धेश्वर हायस्कूल मध्ये झाले.निवृत्तीनंतर त्यांनी आर्मीमध्ये भरती होऊ पाहणाऱ्या तरुणांना काही काळ मार्गदर्शन केले. देवराई ते सावरगाव घाट सकाळी रनिंग करीत त्यांनी तरुणांना घेऊन व्यायाम व अभ्यास यासंबंधी मार्गदर्शन करण्याचे काम केले. कष्ट आणि जिद्दीच्या बळावर अशक्य असं काहीही नाही याचा मोठा आदर्श निलेश पालवे यांनी तालुक्यातील तरुणांच्या समोर ठेवला आहे.निलेश पालवे यांचे बंधू वकील श्री सतीश पालवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,कुटुंब म्हणून आम्ही निलेशला काहीही सुविधा देऊ शकलो नाही,वेळ देऊ शकलो नाही.वडिलांच्या आजारपणात कित्येकदा हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ बसून त्याने अभ्यास केला आहे. मी नक्कीच यशस्वी होऊन दाखवेन असं त्याने वडिलांना सांगितलं देखील होतं. परंतु दुर्दैवाने आज वडील आमच्यात नाहीत. त्यांचं स्वप्न निलेशने सर्व मानसिक दडपण झुगारून देऊन पूर्ण केलं याचा मोठा आनंद आणि अभिमान आम्हाला आहे. यावेळी निलेश पालवे यांनी बोलताना सांगितले कि,30 सप्टेंबर 2020 रोजी निवृत्त होऊन गावाकडे आलो उत्तराखंड ,गोवा ,बंगाल ,आसाम दिल्ली ,उधमपूर ,आणि शांतिसेनेच्या माध्यमातून आफ्रिका (युनायटेड नेशन्स ) येथे देशासाठी सेवा दिली आहे व यापुढेही देशसेवा करत राहणार असल्याचे सांगितले .

Post a Comment

0 Comments