श्रीरामपूर – श्रीरामपूर पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही करत हद्दीतील तीन सोनसाखळी चोर ताब्यात घेवून चार जबरी चोरीचे गुन्हे उघड केले असून चोरट्या कडून एकुण ५.८५,०००/- मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अनमोल रसवंती, बेलापुर रोड येथुन फिर्यादी रामदास भाऊसाहेब खंडागळे,
रा. एकलहरे, ता. श्रीरामपुर हे त्यांची दि.
११/११/२०२२ रोजी रात्री ११ वाजता हिरो प्लेंडर प्लस मोटरसायकलवर पत्नीसह घरी जात असताना,
त्यांचे पाठीमागुन मोटरसायकलवरून येणारे तीन अनोळखी इसमांनी पत्ता
विचारण्याचा बहाना करून,गाडी अडवुन, फिर्यादी
व फिर्यादीची पत्नी यांना मारहाण केली व फिर्यादीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व
फिर्यादीचे पत्नीचे गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरून नेहले बाबत दाखल
गुन्ह्यात पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असता, यातील आरोपीचे मिळते वर्णनाचा एक इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून
त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आरोपी अक्षय सुरेश कुलथे रा. राहुरी असे
सांगितले त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून तपास केला असता, त्याने
सदरचा गुन्हा हा त्याचं साथीदार आरोपी नामे विशाल ऊर्फ गणेश बाळासाहेब शेटे व आरोपी
दिपक रामनाथ पवार रा. राहुरी यांचे सह गुन्हा केल्याचे कबुल केले असता पोलीस
पथकाने तपासाची चक्र फिरवीत लागलीच फरार आरोपींचा शोध घेतला असता ते श्रीरामपुर
मध्ये चोरीचे मोटरसायकलवर येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेने सापळा लावुन,
पाठलाग करून, त्यांना शिताफिने पकडले असता,
त्यांचे ताब्यातील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल मिळुन आली. त्यानंतर
आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये दाखल गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी
तीन जबरी चोरी चैनस्नॅचिंगचे गुन्ह्यात एकूण ६.५ तोळे सोन्याचे दागिने व युनिकोर्न
मोटार सायकल चोरून गुन्हे केल्याची कबुली दिली.
0 Comments