पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे श्रीक्षेत्र
लोहसर देवस्थान ट्रस्टने ७५१ किलोचा पितळी ध्वजस्तंभ
उभारला असुन महाराष्ट्रातील शिर्डी व त्र्यंबकेश्वर नंतर अशा प्रकारचा भव्य पितळी
ध्वजस्तंभ श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर उभारला असून भव्य पितळी ध्वजस्तंभ भाविकांचे
आकर्षण ठरले असून यामुळे देवस्थानच्या वैभवात आणखी भर पडली आहे.
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम चालु आहे. मागील वर्षी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यात लोहसर येथील श्री कालभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते यांनी भक्तांना आणि ग्रामस्थांना आवाहन केले होते की, आपल्या घरातील पितळी न वापराच्या वस्तु या स्तंभाची दान कराव्यात. भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी दोन हजार किलो जुने पितळी भांडे या स्तंभाची दान केले होते. तर अनेक भक्तांनी आर्थिक स्वरुपात देणगीही दिली होती. लोहसर येथील श्री कालभैरवनाथ मंदिरासमोर स्थापन केलेल्या या ध्वजस्तंभास १२ लाख रुपये खर्च आला असुन महाराष्ट्रातील शिर्डी व त्र्यंबकेश्वरच्या आता श्रीक्षेत्र लोहसर येथेच असा ध्वजस्तंभ आहे.
या ध्वजस्तंभाचे दि.१७ नोव्हेंबर रोजी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री, महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे, महंत लक्ष्मण महाराज कराड, ह.भ.प.संतोष महाराज गिते भगवान गड, आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीलेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असल्याची माहिती श्री काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते यांनी दिली.
0 Comments