श्रीरामपूर पोलिसांनी पकडल्या चोरीच्या २० मोटार सायकली

श्रीरामपुर - शहर पोलीसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीला गेलेल्या सुमारे ९,७०,०००/- रुपयाच्या चोरीस गेलेल्या २० मोटरसायकल चोरट्या कडून जप्त केल्या असून श्रीरामपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. 

श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून मोटर सायकल चोरीच्या घटना घडत होत्या त्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस तपास पथक हे सी.सी.टी.व्ही. फुटेज, गुप्त बातमीदार तसेच इतर तांत्रिक बाबींवर तपास करत असताना, खात्रीलायक माहिती मिळाल्या वरून आरोपी इसम नामे इब्राहिम गणी शहा, रा. बीफ मार्केटजवळ, वॉर्ड नं. २. श्रीरामपुर हा अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटरसायकल चोरत असून सध्या तो श्रीरामपुर शहरात चोरलेल्या मोटरसायकल वर फिरत आहे अशी माहिती मिळाल्या वरून तपास पथकाने तपासाची चक्र फिरवत शिताफिने सापळा लावला. आरोपी इब्राहिम गणी शहा हा चोरीचे मोटरसायकलवर मिळालेल्या माहितीचे ठिकाणी आला असता, तपास पथकाने अचानक झडप घालत त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असता त्यास चोरीचे गुन्ह्यात अटक करून आरोपीस पोलीस कोठडीत घेवून सखोल तपास केला असता आरोपीचे ताब्यातून ९,७०,०००/- रुपये किमतीचे एकूण २० मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,स्वाती भोर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके,अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर ग्रामिण चार्ज श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी यांचेकडील पथकातील सपोनि जिवन बोरसे, पोसई दादाभाई मगरे, पोहेको अतुल लोटके, पोना, गणेश भिंगारदे, पोना संजय पवार, पो.ना. रघुवीर कारखेले, पो.ना वीरप्बिपा करमल, पोना सोमनाथ गाडेकर, पो.कॉ. गोतम लगड, पो.कां. राहुल नरवडे, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो.कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिंद्र कानखडे, पोको हरीष पानसंबळ, पोका संपत बड़े, पोको नंदकुमार लोखंडे, पो कॉ भारत तमनर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पो.ना. फुरकान शेख व पो.कॉ प्रमोद जाधव यांनी केली आहे.

श्रीरामपूर पोलिसांनी आरोपी कडून जप्त केलेल्या मोटारसायकलीचे वर्णन 

Post a Comment

0 Comments