पाथर्डीतील शेतमालाच्या चोरीने शेतकरीवर्ग धास्तावला

पाथर्डी – तालुक्यातील शेती मधून तयार केलेले कापूस तसेच घासाच्या बियाण्यां सारख्या इतर नगदी पिकाची शेतातून परस्पर चोरी होत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला असून रात्रीच्या अंधारात भुरटे चोर थेट शेतात चोरी करत असल्याने आधीच घरफोडी रस्ता लुट यासारख्या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने शेतमालाच्या चोऱ्या मुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. 

फिर्यादी अशोक श्रीधर शींदे रा.दगडवाडी ता.पाथर्डी.जि.अ.नगर यांचे दगडवाडी येथील राहते घरी दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ ते दिं २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ३५,०००/- रुपये किमतीचे ३५ किलो वजनाचे घासाचे बियाणे अज्ञात चोरटयाने लोंखडी दरवाजा उघडुन घरात प्रवेश करुन घरात गोणीत ठेवलेले घासाचे बी चोरुन नेले आहे सदरची घटना घडले पासुन फिर्यादी यांचे गावात व फिर्यादी याचेकडे काम करणारा इसम नामे सुदाम मोतीराम रणमले रा.वाशीम पुर्ण् पत्ता माहीत नाही हा गावात दिसुन आला नाही तरी सदरची चोरी ही त्यानेच केली असावी असा फिर्यादी चा संशय असल्याने याबाबत फिर्यादी अशोक श्रीधर शिंदे यांच्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुदाम मोतीराम रनमले रा वाशीम याचे विरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास हवालदार अरविंद चव्हाण हे करत आहेत.कोरोना आणि अतिवृष्टी मधून शेतकरी वर्गाने पोटाला चिमटा काढत कष्ट करून शेतमाल पिकवला असून तोच शेतमाल चोरी जावू लागल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. शहरातील चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात अपयशी ठरलेली पोलीस यंत्रणा आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही या आसुरी आनंदाने चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील नगदी पिकांवर वळवला आहे त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी मोठ्या पेचप्रसंगात अडकला आहे.

 

Post a Comment

0 Comments