ग्रामसेवक भाकरे यांच्या मृत्युच्या चौकशीसाठी करंजीत बंद

 

करंजी - येथील तरुण ग्रामसेवक अनिल भाकरे यांच्या निधनानंतर आज गावातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पासुन घटनेचा निषेध केला. गजबजलेल्या करंजी बसस्टॅण्डवर आज शुकशुकाट होता. तर परिसरात शोककळा पसरली होती.अपघात असो किंवा घातपात असो त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची संतप्त नागरिकांनी मागणी केली.

 


नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी बसस्थानकाजवळ सोमवारी रात्री ११ च्या दरम्यान येथील ग्रामसेवक अनिल भाकरे हे मोटार सायकल अपघातामुळे गंभीर अवस्थेत रस्त्यात पडले असताना त्यांना तातडीने नगरच्या हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने पुण्याला हलविण्यात आले होते. मात्र पुण्यातच त्यांचा मृत्यु झाला. काल रात्री उशिरा साडेनऊ वाजता त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी, नगर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, पदाधिकारी,जिल्ह्यातून आलेले ग्रामसेवक गावातील तसेच परिसरातील अनेक मान्यवरांनी अनिल भाकरे यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी ग्रामसेवक अनिल भाकरे यांचा मृत्यु अपघाताने किंवा घातपाताने झालेला असो याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी अनेक वक्त्यांनी केली. अनेक संतप्त तरुणांनी हा अपघात नसुन घातपात असल्याचा संशय व्यक्त करुन या घटनेचा निषेध केला. आणि त्यांच्या मृत्युच्या चौकशीची मागणी केली. शेवटी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी या घटनेचा निषेध करुन आम्ही सर्व ग्रामस्थ भाकरे कुटुंबाच्या दुखाःत सहभागी असुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments